Sugarcane Crushing : गाळप हंगामाला अखेर सुरुवात

महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये रेंगाळलेला परतीचा पाऊस आता थांबला. नव्या ऊस गाळप हंगामाची सुरुवात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात झाली आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या प्रमुख ऊस उत्पादक (Sugarcane Producers) राज्यांमध्ये रेंगाळलेला परतीचा पाऊस (Heavy Rainfall) आता थांबला. नव्या ऊस गाळप हंगामाची सुरुवात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात झाली आहे. मात्र उत्तर प्रदेशासह इतर ऊस उत्पादक राज्यांचा गाळप हंगाम आठवडाभरात सुरु होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना (Nationalize Co-Operative Sugar Mill Organisation) महासंघाने सांगितले.

Sugarcane Crushing
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

साखर वर्ष २०२२-२३ चा गाळप हंगाम अखेर सुरु झाला. गाळप हंगाम ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ असा असेल. चालू हंगामात विक्रमी ३६०० लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे. या ऊस गाळपातून ४१० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. तर सुमारे ५० लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी होईल, असाही अंदाज महासंघाने व्यक्त केला आहे. देशातील साखरेचा वापर म्हणेजच खप २७० लाख टनांवर होण्याचा अंदाज आहे.

नव्या हंगामाच्या सुरुवातीला मागील हंगामातील ५५ लाख टन साखर साठा शिल्लक आहे. तर नव्या हंगामात देशातून ८५ लाख टन साखर निर्यातीची अपेक्षा आहे. देशातील उत्पादन, वापर आणि निर्यात लक्षात घेता ३० सप्टेंबर २०२३ ला म्हणेजच हंगामाच्या शेवटी ६० लाख टन साखर शिल्लक राहील. ही शिलल्क साखर देशाला अडीच ते तीन महिन्याने पुरेल.

राज्यात यंदा गाळप हंगाम उशिरा सुरु झाला आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम राज्यात मे ते जून २०२३ पर्यंत लांबण्याची देखील शक्यता आहे. कारण उसाच्या क्षेत्रात वाढ झाली. तसेच परतीच्या पावसामुळे उभ्या उसाच्या वजनात देखील वाढ झाली. त्यामुळे एकूण नवा हंगाम विक्रमी गाळपाचा तसेच विक्रमी साखर उत्पादनाचा ठरू शकतो, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com