BSKKV Dapoli : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ‘अॅग्रियुनिफेस्ट’मध्ये यश

भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीतर्फे अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘अॅग्रियुनिफेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते.
BSKKB, Dapoli
BSKKB, DapoliAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News ः भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) दिल्लीतर्फे अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘अॅग्रियुनिफेस्ट’चे (Agriunifest) आयोजन करण्यात आले होते. यात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (BSKKV Dapoli) विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

२०२२-२३ वर्षांतील २१ व्या ‘अॅग्रियुनिफेस्ट’ स्पर्धांचे आयोजन नुकतेच कृषी विज्ञान विश्‍वविद्यालय बंगलोर, कर्नाटक येथे झाले. या महोत्सवामध्ये १७ कलाप्रकारांचा समावेश होता. यामध्ये देशभरातून ५७ कृषी विद्यापीठांनी सहभाग घेतला.

BSKKB, Dapoli
BSKKV Dapoli : नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी शोध समितीची स्थापना

या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाचे संघ सहभागी झाले. कोकण कृषी विद्यापीठाचे २२ विद्यार्थी, दोन संघ व्यवस्थापक आणि संचालक, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम डॉ. विठ्ठल नाईक हे सहभागी झाले होते.

दापोली संघाने दोन सुवर्णपदक व एक ब्राँझ पदकासहित रंगमंचीय कलाप्रकारामध्ये सर्वसाधारण विजेतेपद जिंकले. एकपात्री अभिनय या वैयक्तिक कलाप्रकारमध्ये प्रचिती मालवणकर हिने सुवर्णपदक मिळविले. मूक अभिनय या सांघिक कलाप्रकारामध्ये मल्हार महाजन, अंकित गवाणकर, श्रेयस गायकवाड, सिद्धेश शिखरे, हर्षल पाटील, गितक वाळंजू यांना सुवर्णपदक, पथनाट्य या सांघिक कलाप्रकारामध्ये प्रचिती मालवणकर, दर्शन ठोके, रजत बेटकेकर, सेजल जाधव, जान्हवी गावकर, ओंकार रहाटे, श्रावणी पाटील, चिन्मय सुतार, सानिका निवेंडकर यांनी कास्यपदक मिळविले.

BSKKB, Dapoli
BSKKV Crop Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

विद्यापीठाच्या विजेत्या संघाला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, कुलगुरू एस. व्ही. सुरेशा, आयोजन सचिव एन. बी. प्रकाश यांच्या हस्ते गौरविण्यात आले. एकपात्री अभिनय व पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन सागर प्रकाश माने यांनी तर मूक अभिनयाचे दिग्दर्शन सागर गावंड यांनी केले.

विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. जी. नाईक यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक समन्वयक एन. ए. शिरसाट व एन. एम. पवार यांनी सहकार्य केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, शिक्षण संचालक बी. जी. देसाई, कुलसचिव बी. आर. साळवी यांनी संघाचे अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com