Sugercane Harvesting Subsidy : उसतोडणीसाठी ९५० यंत्रांना अनुदान देणार

Sugercane Harvesting : राज्यभरातून आतापर्यंत ८०० अर्ज; बॅटरीचलित कोयत्यावर संशोधन
Sugarcane Harvester
Sugarcane HarvesterAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Sugercane Harvesting Update : मजूर टंचाईमुळे ऊसतोडणीत (Sugercane Harvesting ) यापुढे झपाट्याने यांत्रिकीकरण (Mechanizatipon) आणावे लागेल. मात्र, कोयता ते हार्वेस्टर या दरम्यान आणखी छोटी तोडणी यंत्रे विकसित करण्याचे आव्हान तंत्रज्ञांसमोर आहे.

तूर्तास, सध्याचे एक कोटी रु पये किमतीचे हार्वेस्टर विकत घेणे शक्य होण्यासाठी राज्यात ९५० यंत्रांना वाटले जाणार असून आतापर्यंत ८०० अर्ज दाखल झाले आहेत, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.

‘यांत्रिक ऊस तोडणीतील समस्या व उपाय’ या विषयावर डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनकडून (डीएसटीए) पुणे कृषी महाविद्यालयाच्या शिरनामे सभागृहात आयोजिलेल्या परिषदेचे उद्‌घाटन क(2) Fertilizer Price: खतांच्या अनुदानासाठी मोठी आर्थिक तोशीस सहन करावी लागणार | ॲग्रोवन - YouTubeरताना ते बोलत होते.

डीएसटीएचे अध्यक्ष शहाजीराव भड तसेच तांत्रिक उपाध्यक्ष एस. डी. बोखारे, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, कृषिरत्न डॉ. संजीव माने, माजी ऊस विशेषज्ञ व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार व्यासपीठावर होते.

Sugarcane Harvester
Sugarcane Harvester : ऊस तोड यंत्रांना मिळणार अनुदान

साखर आयुक्त म्हणाले की, ऊस तोडणीसाठी ३०० रुपयांचा कोयता आणि आता एक कोटी रुपये किमतीचे यंत्र वापरले जात आहे. वर्षानुवर्षे ऊसतोडणी सुरू असताना तोडणीसाठी किफायतशीर व स्वस्त तंत्रज्ञान आपण का आणू शकलो नाही, याचे आश्चर्य वाटते.

राज्याचे वाढते ऊस क्षेत्र विचारात घेता बॅटरीचलित कोयता विकसित करण्यासाठी साखर आयुक्तालयाने कृषी विद्यापीठांना पत्रे लिहिली आहेत. बॅटरीचलित कोयत्यावर संशोधन झाल्यास महिलांना तोडणी कामात मोठ्या प्रमाणात सुविधा मिळेल.

‘साखर उद्योगातील यांत्रिकीकरणात राज्य देशात पुढे आहे. मात्र, कारखान्यांना आता ऊस लागवडीपासून ते गाळप, प्रक्रियेपर्यंत तंत्र बदलावे लागेल.

राज्यातील बहुतेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्याने हंगाम यापुढे ११२ दिवसांपेक्षा जास्त चालणार नाही. त्यामुळे ही कारखानदारी वर्षभर कशी चालेल, याकरिता उत्तम व्यवस्थापन तंत्रावरदेखील कार्यशाळा घ्याव्या लागतील, असेही श्री. गायकवाड यांनी सुचविले.

‘विस्मा’चे अध्यक्ष श्री. ठोंबरे म्हणाले, ‘‘मांजरा साखर कारखान्यांने यंदा ७० टक्के ऊस यंत्राने गाळला आहे. बहुतेक कारखान्यांच्या यांत्रिक तोडणीचे प्रमाण २५ टक्क्यांवर गेले आहेत. मात्र, यंत्राने तोडणी केल्यास प्रतिटन १५० रुपये जादा खर्च सोसावा लागतो. त्यामुळे यांत्रिक तोडणीतील समस्या हटविण्याचे आव्हान तंत्रज्ञांसमोर आहे.’’


साखर उद्योगाचे हित सांभाळणारा पहिला आयुक्त

डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड व प्रख्यात ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार यांनी साखर
आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कामकाजाची मुक्तकंठाने स्तुती केली. ‘‘ऊस संशोधक म्हणून २५ वर्षांपासून मी काम करतो आहे .

मात्र, शेतकरी व कारखाने असे दोन्ही घटकांचे हित सांभाळणारा हा पहिलाच आयुक्त आम्ही पाहिला आहे,’’ असे डॉ. पवार म्हणाले. तर, ‘‘शेतकऱ्यांना ४५ हजार कोटींची एफआरपी मिळवून देण्यासाठी श्री. गायकवाड यांचे परिश्रम व नियोजन स्तुत्य आहेत.

त्यांच्या लेखनाचा आढावा घेणारे पुस्तक ‘डीएसटीए’कडून प्रकाशित केले जाईल’’, असे श्री. भड यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com