Adinath Chavan : काटेकोर शेती पद्धतीचा अवलंब व्हावा

वाढता खर्च आणि घटता नफा पाहता खर्चप्रधान शेती करायची की बचतप्रधान शेती करायची याचा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.
Adinath Chavan
Adinath ChavanAgrowon
Published on
Updated on

उगार खुर्द, जि. बेळगाव ः ‘‘वाढता खर्च आणि घटता नफा पाहता खर्चप्रधान शेती (Agriculture) करायची की बचतप्रधान शेती (Agriculture Practices) करायची याचा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

त्यासाठी सेंद्रिय (Organic) आणि रासायनिक पद्धतीचा संयोग करून केलेली काटेकोर शेती पद्धती अवलंबणे गरजेचे बनले आहे,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण (Adinath Chavan) यांनी शनिवारी (ता. २५) येथे केले.

उगार महिला मंडळाच्या वतीने येथे आयोजित केलेल्या ‘शिवार २३’ या शेतकरी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उगार महिला मंडळाच्या अध्यक्षा स्मिताताई शिरगावकर होत्या.

उद्योगपती प्रफुल शिरगावकर, उगार महिला मंडळाच्या उपाध्यक्ष राधिकाताई शिरगावकर, चित्राताई दळवी, गीताली शिरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Adinath Chavan
Ex Minister Sunil Kedar : माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरण्याची अनेक कारणे आहेत. रासायनिक शेती पद्धतीत सुरू असलेला वारेमाप खर्च निविष्ठा उत्पादक कंपन्यांना समृद्ध करतो आहे. त्यासाठी कर्ज काढून जोखीम स्वतःच्या डोक्यावर घेणारा शेतकरी कंगालच होतो आहे.

या सापळ्यातून आता बाहेर पडावे लागेल. त्यासाठी काटेकोर शेती पद्धती (Precision Farming) अवलंबावी लागेल. शेती हा व्यवसाय आहे आणि ते शास्त्र आहे याचा विसर पडता कामा नये.’’

Adinath Chavan
Agriculture Development : शेती, शेतकरी समृद्धीचा मार्ग रस्ते विकासातून

स्मिताताई शिरगावकर म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागातील महिलांना शेती व पूरक व्यवसायाची माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.’’

युवा दुग्ध व्यावसायिक श्रद्धा ढवण म्हणाल्या, ‘‘आपले शिक्षण सुरू असतानाच दूध व्यवसाय सुरू केला. महिलांनी कोणतेही काम करताना लाज बाळगू नये. नियोजनपूर्वक कष्ट केले तर यश नक्की मिळते.’’

Adinath Chavan
Agricultural Festival : बीड येथे कृषी महोत्सवास सुरवात

सोलापूरच्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अनिता माळगे म्हणाल्या, ‘‘फळे, भाजीपाला स्वच्छ करून पॅकिंग करून तो पाठविल्यास त्याला दर चांगला मिळतो. महिला बाहेर पडल्यास सरकारी यंत्रणांसह समाजातील सर्व घटक त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतात.’’

शेतीमाल निर्यातदार धनश्री शुक्ल यांनी आपला व्यावसायिक बनण्याचा अनुभव सांगत शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचा शेतीमाल तयार करण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.

उत्तम शेती आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या मीना खाडिलकर, सारिका जठार, वैशाली डोंगरे, उदय संकपाळ आणि प्रकाश घळसाशी यांचा सत्कार करण्यात आला. अनिता पुजारी यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com