Nana Patole : सरकारची अवस्था बिकट : नाना पटोले

एकाच मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यावरून सरकारची अवस्था स्पष्ट होते, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
Nana Patole
Nana PatoleAgrowon
Published on
Updated on

अमरावती : एकाच मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यावरून सरकारची अवस्था स्पष्ट होते, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजपवर (Bjp) सडकून टीका केली.

Nana Patole
Raju Shetti : ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद १५ ऑक्टोबरला

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी अमरावती येथे आढावा बैठक घेतली. पटोले म्हणाले, भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांची दखल घेत नसल्याचे वारंवार सांगितले जाते.

Nana Patole
Pm Kisan And Raju Shetty: राजू शेट्टींच्या खात्यावर पीएम किसानचे पैसे कसे जमा झाले ? | ॲग्रोवन

आरएसएस आणि भाजप हे दोघेही राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे अस्वस्थ आहेत. मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच मस्जिद आणि मदरशात धाव घेतली. यावरूनच ते किती अस्वस्थ आहेत हे सिद्ध होते. काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा यशस्वी झाल्याचे हे द्योतक आहे.

आयटी सेल, मोदी मीडियाला उत्तर देण्यासाठी काँग्रेस आता सक्षम होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता खमकेपण यांनी पुढे यावे, असे आव्हान पटोले यांनी केले. या वेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर,

आमदार बळवंत वानखडे, वजाहत मिर्झा, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, अंजली ठाकरे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com