Poultry Management : हिवाळ्यात जपा कोंबड्यांचे आरोग्य

Team Agrowon

शेडमधील ब्रॉयलर कोंबड्यांना वयाच्या पहिल्या आठवड्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. 

Poultry Management | Agrowon

दुसऱ्या आठवड्यात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तापमान लागते. नंतरच्या प्रत्येक आठवड्यात २ ते ३ अंश सेल्सिअसने तापमान कमी करत जावे. 

Poultry Management | Agrowon

थंड हवामानात पिल्लांचे शेड उबदार राहणे गरजेचे असते, त्यासाठी ३ आठवड्यांपर्यंत ब्रुडिंग केले जाते. तापमान वाढविण्यासाठी विजेचे बल्ब, शेगडी इत्यादींचा वापर करावा. 

Poultry Management | Agrowon

कोंबड्यांना योग्य वयात योग्य तापमान न मिळाल्यास, ताण येऊन त्या आजारास बळी पडतात. 

Poultry Management | Agrowon

शेडमधील तापमान खूपच कमी झाल्यास, पिल्लांमध्ये कोल्ड स्ट्रोकमुळे मरतुक येते.

Poultry Management | Agrowon

हिवाळ्यात कमी तापमानामुळे कोंबड्या जास्त खाद्य खातात, त्यामुळे त्यांच्या खाद्यात योग्य बदल करावेत.

Poultry Management | Agrowon
cta image | Agrowon
click here