

Nashik News : ‘ग्रीनझोन ॲग्रोकेम’ (Green Zone Agrochem)संचलित बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने २० व २१ मे दरम्यान ‘बसवंत मधुक्रांती-२०२३’ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पाच विभागांमधील मधुउद्योजकांना (Honey Production) विशेष पारितोषिके देऊन सन्मान होईल.
पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे मुखेड रोड येथील बसवंत गार्डन येथे होणाऱ्या या परिषदेत मधुमक्षिकापालन क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करतील. निवडक सहभागींचे अनुभवकथन व माहितीपूर्ण परिसंवादाचा लाभ यावेळी उपस्थितांना होईल, अशी माहिती ‘ग्रीनझोन’चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी दिली.
‘बसवंत मधुक्रांती २०२३’ पुरस्कारांची निवड ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बी. बी. पवार, ‘ग्रीनझोन ॲग्रोकेम’चे तांत्रिक संचालक डॉ. भास्कर गायकवाड यांच्या समितीने केली.
यात मधमाशी पालनाच्या प्रसाराचे लक्षणीय कार्य करणाऱ्या शहापूर (जि. अमरावती) येथील ‘शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाउंडेशन’ संस्थेला पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच कृतिशील मधमाशी पालन प्रचारक म्हणून कणेरी मठ (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील दयावान पाटील यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. २०१९ पासून सलग हा उपक्रम सुरू आहे. हे पाचवे वर्ष आहे.
मधउद्योजक श्रेणीतील पारितोषिके प्राप्त व्यक्ती
विभाग...व्यक्ती
उत्तर महाराष्ट्र...ऋषिकेश औताडे (श्रीरामपूर, जि. नगर)
विदर्भ...योगिता इंगळे (ता. दर्यापूर, जि. अमरावती)
पश्चिम महाराष्ट्र...ज्योत्स्ना देसाई (गडहिंग्लज, जि. कोल्हापूर)
कोकण...राजू मंडळ (डहाणू, जि. पालघर)
मराठवाडा...तेजस लिमकर (परांडा, जि. धाराशिव).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.