Team Agrowon
मधमाशीपालनामध्ये मधपेट्यांसाठी योग्य जागेची निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मधपेट्या शेतामध्ये सावलीत, प्रवाही पाणी असलेल्या ठिकाणी ठेवाव्यात.
मुंग्या लागणार नाहीत, वाऱ्याचा सरळ झोत न येणारी, समपातळीत जमीन असलेल्या ठिकाणीच मधपेट्या ठेवाव्यात.
मधमाशीपालनास किमान ५ मधपेट्या ठेवून सुरुवात करावी. मधमाशीपालनाच्या योग्यपद्धतीची निवड करून व्यवसायास सुरुवात करावी.
मधमाश्या फुलातील मकरंद किंवा गोड द्रवाचे जिभेने शोषण करतात. हा मकरंद पोटात साठविला जातो. माश्यांच्या लाळग्रंथीतून काही प्रारक मकरंदात मिसळतात आणि त्यातील शर्करेचे साध्या शर्करेत रूपांतर होते.
जेव्हा मध परिपक्व होतो तेव्हाच मधमाश्या साठवण कोष सीलबंद करतात. इतरवेळी ती उघडीच असतात.
शरीराच्या मागील बाजूच्या तळभागावर असलेल्या मेणग्रंथीद्वारे मेणाचा स्राव करतात. मधमाश्यांना थोडेसे मेण तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात मधाचे प्राशन करावे लागते.