
Alibaug News : सिल्व्हर पापलेटला ‘राज्य मासा’ दर्जा देण्याची घोषणा नुकतीच मत्स्य व्यवसाय मंत्रालयाने केली. सिल्व्हर पापलेटला खवय्यांकडून नेहमीच मागणी असते. आता राज्य मासा घोषित केल्याने किमतीही वाढल्या आहेत. रायगडमध्ये सिल्व्हर पापलेटसाठी काही बंदरे विशेष प्रसिद्ध आहेत. घाऊक व्यापारी आता या बंदरांत उतरलेल्या मालाची खरेदी करून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पाठवू लागले आहेत.
श्रावण सुरू असतानाही स्थानिक बाजारात मासळीचा तुटवडा भासू लागला आहे. खवय्यांकडूनही सिल्वर पापलेची मागणी वाढली आहे. किंमत वधारल्याने मासळी बाजारात सिल्व्हर पापलेटचा थाटही वाढला आहे. पापलेटला स्थानिक पातळीवर सरंगा म्हणून ओळखले जाते. सिल्वर पापलेट चविष्ट आणि पौष्टिक म्हणून ओळखले जाते.
पापलेट हे व्यावसायिक दृष्ट्या कोकणातून सर्वाधिक निर्यात होणारे आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेले सागरी अन्न आहे. बोर्ली, धरमतर, बोडणी, जीवना बंदरात पापलेटची आवक जास्त होते. या बंदरांतील पापलेट राज्यातील जिल्ह्यांत निर्यात केले जातात. राज्य मासा जाहीर झाल्यानंतर सिल्व्हर पापलेटच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने सांगितले.
पापलेटच्या उत्पादनात सातत्याने घट
बेसुमार मासेमारीमुळे १९८० पासून पापलेटच्या साठ्यामध्ये घट होत आहे. १९७० च्या दशकात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर साधारण ८,३१२ टन पापलेट मिळायचा. यामध्ये घट होऊन २०१८ पर्यंत ४,१५४ टन पापलेट मिळत असल्याची आकडेवारी मत्स्यव्यवसाय विभागाकडून मिळाली आहे.
बाजारपेठेतील पापलेटच्या मागणीसह मासेमारीच्या पद्धतीतील बदलामुळे लहान आकाराच्या पापलेटची संख्या कमी झाली आहे. भारताच्या वायव्य भागातील पापलेट माशांच्या साठ्यावर विपरित परिणाम झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.