Sugar Mill : ‘क्रांतिअग्रणी’ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ चितळे उद्योग समूहाचे प्रमुख गिरीश चितळे, अध्यक्ष आमदार अरुण लाड, सभासद, संचालकांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला.
Sugar Mill
Sugar Mill Agrowon

कुंडल, जि. सांगली ः क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या (Dr. G. D. Bapu Lad Cooperative Sugar Factory) गाळप हंगामाचा प्रारंभ चितळे उद्योग (Chitale Group) समूहाचे प्रमुख गिरीश चितळे, अध्यक्ष आमदार अरुण लाड, सभासद, संचालकांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. उपाध्यक्ष उमेश जोशी, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, नितीन नवले प्रमुख उपस्थित होते.

Sugar Mill
Sugar Mill : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी साखर कारखाना कटिबद्ध

श्री. चितळे म्हणाले, ‘चितळे व लाड कुटुंबीयांचे ऋणानुबंध चार पिढ्यांपासून आहेत. हा दुग्धशर्करा योग आहे. ‘क्रांती’ने आजवर सहकारी कारखानदारीत आदर्श घातला आहे. हे शेतकरी, साखर उद्योगाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. ऊस उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांतून शेतकऱ्यांचे उत्पादन कमी खर्चात वाढले आहे.

Sugar Mill
Sugar Export : साखर निर्यातीत थायलंडवर मात करण्याचा मनसुबा पाण्यात

एक प्रकारची हरित क्रांती झाली आहे. भविष्यात अधिकाधिक इथेनॉलनिर्मिती ही काळाची गरज ओळखून क्रांती कारखाना भविष्याची पावले टाकेल. इंधनाच्या दृष्टीने देशाला स्वयंपूर्ण बनवेल.’

लाड म्हणाले, ‘गत हंगामात ३२ शेतकऱ्यांनी एकरकमी एफआरपी मागितली. ती त्यांना दिली आहे. अजूनही वाढीव दर द्यायला तयार आहे मात्र साखर, इथेनॉलचे दर वाढणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखाने टिकले पाहिजेत. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड म्हणायचे, ‘संस्थेचे मालक न होता कुंपण व्हावे.’ आम्ही तो आदर्श ठेवून उद्योग चालवत आहोत.

पहिल्या हंगामापासून कोणाचेही देणे थकले नाही. सर्व देणी वेळेत दिली. साखर उद्योग सर्वांच्या साथीने सोपा होऊ शकतो. त्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.’ कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले.

ॲड. सतीश चौगुले यांनी आभार मानले. सुबोध वाळवेकर, महेंद्र करांडे, डी. एस. देशमुख, श्रीकांत लाड, कुंडलिक एडके, राजेंद्र लाड, जयप्रकाश साळुंखे यांच्यासह संचालक, शेतकरी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com