
Agriculture Drone Technology कोल्हापूर ः शेतीपिकांसाठीच्या औषध खर्चात बचत व्हावी यासाठी आम्ही ड्रोनद्वारे औषध फवारणी (Drone Spraying) सेवा उपक्रम राबवत आहोत. यासाठी ग्रामीण भागातील युवकांना आमच्या कंपनीच्या वतीने ड्रोन पायलट (Drone Pilot Training) प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध केली आहे, अशी माहिती क्रियाजेन कंपनीच्या ॲग्री टेक विभागाचे प्रमुख अमित नलवडे यांनी दिली.
कागल येथे कंपनीच्या कार्यालयात ड्रोन पायलट प्रशिक्षण घेतलेल्या प्रतिनिधींना ड्रोन वितरण कार्यक्रमाप्रसंगी नलवडे बोलत होते. बेंगलोरमधील क्रियाजेन उद्योग समूहाच्या ॲग्री ॲप टेक्नॉलॉजिज कंपनीचे सरव्यवस्थापक नुरुल हसन व प्रमुख अमित नलवडे यांच्या हस्ते प्रतिनिधी अजित शेळके (कवठेगुलंद), राकेश शिंगे (टाकवडे) यांना ड्रोन वितरित करण्यात आले.
ग्रामीण भागातील तरुणांना शेती क्षेत्रात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने करायला हवा या विषयासाठीचे प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणानंतर संबंधितांना हवी असल्यास कंपनीमार्फत नोकरीची संधी दिली जाते.
अशा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना ड्रोन देत औषध फवारणी उपक्रमाच्या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. क्रियाजेन कंपनीमार्फत कोल्हापूर परिसरात या सेवेची सुरुवात झाली.
नलवडे म्हणाले, की कंपनीच्या वतीने ड्रोनद्वारे औषध फवारणी उपक्रम हाती घेतला आहे. अल्प दरात ही सेवा शेतकरी, सहकारी सोसायटी, साखर कारखान्यांसह अन्य संस्थांना पुरवली जाते.
कंपनीचे प्रतिनिधी प्रशिक्षित ड्रोन पायलट असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी होते. कंपनीमार्फत लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात सेवा सुरू करणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.