केज, जि. बीड (प्रतिनिधी) : निसर्गाचा लहरीपणा, वाढता उत्पादन खर्च व शेत मजुरांची कमतरता या कारणांमुळे शेती करणे अवघड झाले आहे. शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची कामे करत आहेत. अशाच प्रकारचा प्रयोग इस्थळ येथील प्रगतशील दोघा शेतकऱ्यांनी ड्रोनच्या (Agriculture Drone) साहाय्याने कीटकनाशक फवारणी (Fertilizer Spraying) करून केला आहे.
विविध समस्यांमुळे बहुभूधारक शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. वडिलोपार्जित शेती सोडता येत नसल्याने व्यवसायाशी निगडित नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे हे अपरिहार्य झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने वेळ व होणारा खर्च काही प्रमाणात कमी करता येतो, हे त्यांच्या लक्षात आलेय.
सध्या गावशिवारात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील इस्थळ येथील प्रगतशील शेतकरी हनुमंत गोपीनाथ काळदाते व अशोक नामदेव शिंदे यांनी आपल्या शेतात कृषी सहाय्यक गोविंद टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली चक्क ड्रोनच्या (Agriculture Drone)साहाय्याने सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणीचा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला.
शिवारात ड्रोनचा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी ही हवाई फवारणी (Fertilizer Spraying) पाहण्यास येथे आले होते. यावेळी कृषी सहायक टोपे यांनी या नव्या तंत्रज्ञानामुळे (Agriculture Technology) वाचणारा वेळ, पैसा याची माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांनाही हे ड्रोन तंत्रज्ञान (Drone Technology) चांगलेच भावले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.