Crop Loan : वाशीम जिल्ह्यात पीककर्ज वाटपाला गती

Kharif Crop Loan : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, लागवड व मशागतीचा खर्च करण्यासाठी पीककर्ज वाटप केले जात आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Washim News : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, लागवड व मशागतीचा खर्च करण्यासाठी पीककर्ज वाटप केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ हजार शेतकऱ्यांना सुमारे ८०७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे १४३ कोटी रुपये अधिक वाटप झाले आहेत, हे विशेष.

सन २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ११७ शाखांमधून पाच जूनपर्यंत ८४ हजार १९ शेतकऱ्यांना ८०७ कोटी ९१ लाख रुपये पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मागील चार वर्षांत खरीप हंगामाचा विचार केल्यास पाच जूनपर्यंत सर्वाधिक खरीप पीककर्ज बँकांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. मागील वर्षापेक्षा १४३ कोटी ३४ लाख रुपये जास्त वाटप झाला.

Crop Loan
Crop Loan : कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना बजावली नोटीस

जिल्ह्यातील शेतकरी घेतलेल्या पीककर्जाचा भरणा निर्धारित वेळेत करीत असल्यामुळे त्यांना दरवर्षी पीककर्ज घेताना अडचणी येत नाही. एक एप्रिलपासून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे काम बँकांच्या विविध शाखांमध्ये सुरू झालेले आहे.

Crop Loan
Crop Loan : पुणे ‘पीडीसीसी’ कडून पुरंदरसाठी १२५ कोटींचे पीककर्ज वाटप

जिल्ह्यात बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हर्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या ११ राष्ट्रीयीकृत बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक या चार खासगी बँका, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँक आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा या बँकांच्या ११७ शाखांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात येत आहे.

५ जूनपर्यंत चार वर्षांतील कर्जवाटप

सन २०२० २५० कोटी ८७ लाख

सन २०२१ ५९१ कोटी ७२ लाख

सन २०२२ ६६४ कोटी ५६ लाख

सन २०२३ ८०७ कोटी ९१ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com