Crop Loan : पुणे ‘पीडीसीसी’ कडून पुरंदरसाठी १२५ कोटींचे पीककर्ज वाटप

Pune PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामासाठी मेअखेर पुरंदरमधील १६ हजार ५३७ शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी एकूण १२५ कोटी ८८ लाख ६६ हजार रुपयांचे पीककर्जवाटप करण्यात आले.
Crop Loan
Crop Loan Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
PDCC Bank : सासवड, जि. पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) मेअखेर पुरंदरमधील १६ हजार ५३७ शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी एकूण १२५ कोटी ८८ लाख ६६ हजार रुपयांचे पीककर्जवाटप करण्यात आले.

बँकेच्या पुरंदरमधील १३ शाखा आणि ९५ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून १२ हजार ७४८ हेक्टरहून अधिक क्षेत्रावर हे पीककर्ज देण्यात आले असून, सप्टेंबरअखेरपर्यंत हे पीककर्ज वाटप सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक संजय जगताप यांनी दिली.

Crop Loan
Crop Loan : रब्बीत २१६ कोटींचे पीककर्ज वाटप

तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे सचिव, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांसह जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी यांची आमदार संजय जगताप यांनी सासवड येथे जिल्हा बँकेच्या कार्यालयात बैठक घेऊन पीककर्ज वाटपाबाबत आढावा नुकताच घेऊन सूचना केल्या.

कांद्यासारख्या शेतीमालाचे कोसळणारे बाजारभाव, बदलते हवामान, अवकाळीचा फटका अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ज्या शेतकरी सभासदांनी ३१ मार्चपूर्वी पीककर्जाची संपूर्ण बाकी भरली अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना मागील पीककर्जापेक्षा अधिक रक्कम चालू खरीप हंगामात देण्यात आली आहे.

Crop Loan
Rabi Crop Loan : पुणे जिल्हा बँकेकडून रब्बीत ४२४ कोटींचे पीककर्ज वितरण

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे.

पुरंदर तालुक्यातील ७ हजार ८५७ नियमित पीककर्ज भरणाऱ्या सभासदांना ३२ कोटी २४ लाख ११ हजार २२८ रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले. तसेच उर्वरित सभासदांना प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शासनाकडे वेळोवेळी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.


या पिकांसाठी पीककर्ज
तूर, मूग, उडीद, भात, ज्वारी, बाजरी, कपाशी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची अशा पिकांसाठी पीककर्ज वाटप होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com