Congress Maharashtra President : प्रदेशाध्यक्ष हटविण्यासंदर्भातील हालचालींना वेग

Nana Patole : विदर्भाचे विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधीपक्षनेते झाल्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Nana Patole
Nana Patoleagrowon

Nagpur News : विदर्भाचे विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधीपक्षनेते झाल्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात संतुलन साधण्यासाठी आता प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याला करावे, अशी मागणी केली जात आहे. परिणामी प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीत असलेले माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार यांची संधी हुकणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही नावाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. तत्पूर्वी वर्षभरापासून पटोले यांना हटवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपासूनच विदर्भातील काही नेत्यांनी पटोले यांच्या विरोधात दिल्लीत मोर्चेबांधणी केली होती. यात विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार आघाडीवर होते.

Nana Patole
पीककर्ज उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या बँकांवर कारवाई; वडेट्टीवार यांचा इशारा

नाशिकच्या निवडणुकीच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे नेत बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराजी दर्शवली होती. केदार आणि वडेट्टीवार यांनी संयुक्तपणे अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या करून पटोले यांच्या विरोधात मोहीम उघडली होती.

यावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल सादर झाला आहे. तत्पूर्वी कर्नाटकची निवडणूक असल्याने सर्वांना आपसातील वाद मिटवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Nana Patole
Nana Patole : 'पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न'

उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने काँग्रेसला संख्याबळाच्या जोरावर विरोधीपक्ष नेतेपद चालून आले. आपसातील मतभेदांमुळे काँग्रेस ही संधी गमावणार असेच सर्वांना वाटत होते. मात्र यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी कुठलाही वाद निर्माण व्हायच्या आत वडेट्टीवार यांच्या नावाला पसंती दिली. विदर्भाला प्रतिनिधित्त्व दिल्याने आता नाना पटोले यांच्या विरोधकांना बळ मिळाले आहे.

विदर्भाचा कोटा संपल्याने आता पश्चिम महाराष्ट्राला प्रदेशाध्यक्ष देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असेलल्या सुनील केदार यांची अडचण होऊ शकते. दोन्ही प्रमुख पदे एकाच भागाला देण्याची शक्यता फार कमी आहे.

दुसरीकडे विदर्भातून काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतात. त्यामुळे दोन पदे विदर्भात असल्याने पक्षाच्या फायद्याचेच आहे, असाही दावा पटोले समर्थकांमार्फत केला जात आहे. विधानसभेचे अधिवेशन संपल्याने आता प्रदेशाध्यक्ष बदलल्या संदर्भातील हालचालींना अधिक वेग येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com