Nana Patole : 'पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न'

Maharashtra Monsoon Session : सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे अशी भूमिका नाना पटोले यांनी स्पष्ट केली.
Nana Patole
Nana Patoleagrowon
Published on
Updated on

Maharashtra News : मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे अशी भूमिका नाना पटोले यांनी स्पष्ट केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्य सरकार पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे.

पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम ४ ऑगस्टपर्यंत ठरलेला आहे. हा दुसरा आठवडा सुरु आहे. आणखी एक आठवडा बाकी असताना अधिवेशन संपवणे हे योग्य नसल्याचे पटोले म्हणाले.

तसेच राज्यात आज अनेक समस्या आहेत, शेतकरी, कष्टकरी, तरुणवर्ग, महिला, बेरोजगारी, महागाईसह अनेक प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींसाठी अधिवेशन हेच महत्वाचे व्यासपीठ आहे. सरकारने जनतेच्या प्रश्नासाठी अधिवेशन पूर्ण वेळ चालवण्याची भूमिका पटोले यांनी मांडली.

Nana Patole
Nana Patole : 'सरकारवर शेतकरी, गरीब जनतेचा विश्वासच राहिला नाही'

अजित पवारांवर मिश्किल टीप्पणी

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारच उपमुख्यमंत्री होते. खरंतर मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी जो त्रास दिला होता, त्या पद्धतीचा त्रास त्यांना द्यायला पाहिजे होता. आमचा काय दोष आहे त्यात? तुम्ही तसा त्रास देत होतात असे शिंदे गटाचे आमदार सांगत होते. म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय.

आम्हा लोकांच्या मतदारसंघात निधी दिला गेला नाही. अजित पवार फार निर्मळ मनाचे आहेत. त्या निर्मळ मनाचा वापर झाला पाहिजे. आमच्या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघात २५-२५ कोटी रुपये देऊन टाकले, तर वादच संपतो, अशी मिश्किल टिप्पणी नाना पटोले यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com