Soybean Seed : वाशीम जिल्ह्यात यंदा मुबलक प्रमाणात घरचे सोयाबीन बियाणे

येत्या हंगामासाठी लागणारे सोयाबीन बियाणे घरचेच वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यासाठी लागणारे बियाणे शेतकऱ्यांनी तयार केले असून, सध्या जिल्ह्यात सुमारे तीन लाख क्विंटल बियाणे आहे.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon
Published on
Updated on

Kharif Season येत्या हंगामासाठी लागणारे सोयाबीन बियाणे (Soybean Seed) घरचेच वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यासाठी लागणारे बियाणे शेतकऱ्यांनी तयार केले असून, सध्या जिल्ह्यात सुमारे तीन लाख क्विंटल बियाणे आहे. हंगामासाठी आवश्‍यक बियाण्यांपेक्षा हा साठा अधिक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

शासनाचा कृषी विभाग गेल्या काही हंगामापासून शेतकऱ्यांना स्वतः उत्पादित केलेले बियाणे वापरासाठी प्रोत्साहित करीत आहे. वाशीम जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची तालुकानिहाय माहिती गोळा करण्यात आलेली आहे.

त्यांच्याशी कृषी सहायक हे सातत्याने संपर्क राहून बियाणे टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना सुचवतात. तसेच लागवडीपासून तर बियाणे तयार होईपर्यंतही वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.

Soybean Seeds
Soybean Seed : केवळ बीजोत्पादनासाठी घ्या उन्हाळी सोयाबीन

यामुळे जिल्ह्यात या हंगामात शेतकऱ्यांनी तीन लाख ४ हजार क्विंटल बियाणे तयार केले आहे. जिल्ह्याचे तीन लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्र अपेक्षित आहे. हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरले जाते.

त्यामुळे यासाठी साधारणतः २ लाख २८ हजार क्विंटल बियाणे लागते. हंगामासाठी बियाणे कंपन्यांकडून सुमारे ६७ हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध करून दिले जाईल.

यामुळे जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची मुबलकता आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या बियाण्यांची डिसेंबर, मार्च या महिन्यांत तपासणी झाली.

पेरणीपूर्वी शेवटची तपासणी या महिन्यात केली जाईल. ज्या बियाण्यांची उगवणक्षमता ७० टक्क्यांवर आहे, असे बियाणे पेरणीसाठी लागवडीला वापरण्याबाबत सांगितले जाते.

Soybean Seeds
Soybean Seed : घरगुती बियाणांची चळवळ का महत्त्वाची आहे?

मागील वर्षात वाशीम जिल्ह्यातून वर्धा, अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी केले होते.

त्याची उगवणही चांगली झाली होती. कंपन्यांच्या बियाण्यापेक्षा हे बियाणे कमी दरात मिळते. यातून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतात. त्यामुळेही शेतकऱ्यांचा कल घरचे बियाणे तयार करण्याकडे वाढलेला आहे.

वाशीम जिल्ह्याची स्थिती

सोयाबीन प्रस्तावित क्षेत्र ३ लाख ४ हजार ५८८ हेक्टर

बियाणे गरज २लाख २८ हजार क्विंटल

शेतकऱ्यांकडे उपलब्धता ३ लाख ४ हजार क्विंटल

कंपन्यांचे बियाणे ६७ हजार क्विंटल

येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७० टक्के उगवणक्षमता असलेले सुमारे तीन लाख ४ हजार ५८८ क्विंटलपेक्षा अधिक बियाणे तयार केले आहे. कृषी विभागाने राबवलेल्या मोहिमेमुळे शेतकरी जागरूक होऊन स्वतः बियाणे तयार करण्यासाठी पुढे आलेला आहे. यातून त्याला आर्थिक फायदासुद्धा होत आहे.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com