Rain Update : बुलडाणा जिल्ह्यात पावसाने चिंता वाढवली

गेल्या २४ तासांत बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर या तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. हिरडव मंडलात तर तब्बल ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Soybean Production
Soybean ProductionAgrowon

अकोला ः या भागात सार्वत्रिक पावसाचा जोर (Rain Intensity) कमी झालेला असला तरी मागील २४ तासांत मराठवाड्याला लागून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस Heavy Rainfall) झाला. आधीच सततच्या पावसाने सोयाबीन काढणीवर (Soybean Harvesting Affected By Rain) परिणाम झाला होता. आता या पावसाने सोयाबीन उत्पादकांची (Soybean Farmer) चिंता वाढवली आहे.

Soybean Production
Soybean Rate : सोयाबीन, कापूस दरासाठी राज्यभर आंदोलन : तुपकर

गेल्या २४ तासांत बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर या तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. हिरडव मंडलात तर तब्बल ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Soybean Production
Crop Damage : अतिवृष्टीबाधितांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या

याशिवाय सुलतानपूर ६६.८, लोणार ४२, अंजनी खुर्द ३३.५, बिबी २९, टिटवी ३०.३ सिंदखेडराजा तालुक्यात सिंदखेडराजा ६६, किनगावराजा २९.८, मलकापूर पांगरा २९, दुसरबीड १८.८, सोनोशी ४०.५, शेंदुर्जन ४२.३, साखरखेर्डा ३२.५, देऊळगावराजा ४८.३, देऊळगावराजा ग्रामीण ५२, तुळजापूर ५२, मेहुणाराजा ४७.२, अंढेरा २१.८, देऊळगावराजा ४४.३, मेहकर २६, जानेफळ ५०, हिवरा आश्रम ३९.५, शेलगाव देशमुख २७.५, डोणगाव १६.८, देऊळगावमाळी ५१.८, वरवंड २०.३, लोणी २७.५, अंजनी बुद्रूक १६.८ नायगाव दत्तापूर २६ मिलिमीटर असा पाऊस झालेला आहे.

सोमवारी (ता.१७) सकाळीही पावसाने ठिकठिकाणी हजेरी दिली. सध्या प्रामुख्याने सोयाबीनचा हंगाम शिगेला आलेला असून पावसाने नुकसान होत आहे. उर्वरित तालुक्यात पावसाने उघडीप दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com