Soybean : जालन्यात ८०० एकरावर सोयाबीनचे पीक प्रात्यक्षिक

सोयाबीन पिकामध्ये मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी बीबीएफ तंत्रज्ञान व जोड ओळ तंत्रज्ञानाचा अवलंब करून आत्माच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात पीक प्रात्यक्षिके राबविले जात आहेत,
Soybean
Soybean Agrowon

जालना : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान (Agriculture Modern Technology) आत्मसात करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कृषी विभागाच्या (Agriculture Department) आत्माच्यावतीने जालना जिल्ह्यात ८०० एकरावर सोयाबीनचे पीक प्रात्यक्षिक (Soybean Crop Demonstration) घेतली गेली आहेत.

Soybean
Soybean : देशात ४० लाख टन सोयाबीन शिल्लक?

सोयाबीन पिकामध्ये मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी बीबीएफ तंत्रज्ञान व जोड ओळ तंत्रज्ञानाचा अवलंब करून आत्माच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात पीक प्रात्यक्षिके राबविले जात आहेत, जोड ओळ पद्धतीमध्ये पट्टा सोडल्या जातो. त्यामुळे या पद्धतीमध्ये रोपातील व ओळींतील अंतर कायम राहून काही अंतरावर सोडलेल्या पट्ट्यांमुळे त्यात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणातच मिळून हवा खेळती राहते व रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते.

Soybean
Soybean : देशात ४० लाख टन सोयाबीन शिल्लक?

तर पट्ट्यांमुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होते. तसेच पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते. अशा प्रकारची शेती केल्याने बियाण्यांचा खर्च कमी करता येतो असे आत्मा यंत्रणेने कळविले आहे. कमी वेळेत कमी खर्चात लागवड करता येत असून खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व रोग किडींचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते. आणि बीबीएफ पद्धतीने मूलस्थानी जलसंधारण होऊन कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास पिकाचे नुकसान न होता फायदा होत असल्याचे समोर आले आहे.

गत जवळपास एक महिना सतत पाऊस पडत आहे.तरी अशा पावसात बेड वर सोयाबीन टोकन केल्यामुळे, कुठल्याही प्रकारचे नुकसान दिसून आले नाही. झाडाची, फांद्यांची, फुटव्यांची, वाढीची, व झाडाच्या शाखीय वाढीची यावर आज पर्यंत कुठलाही परिणाम सतत पडलेल्या पावसाचा झाला नाही असे प्रात्यक्षिकात दिसून आल्याचे आत्माने कळविले आहे.

रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केल्यास फायदा होत असल्याचे दिसत आहे. विशेष करून जास्त किंवा कमी पाऊस झाल्यास व मध्यम व हलक्या प्रतीच्या जमिनीत ही पद्धत फायदेशीर ठरली आहे.
शीतल चव्हाण, प्रकल्प संचालक, आत्मा जालना
भोकरदन तालुक्यात जुलै महिन्यात अनेकदा मोठा पाऊस होऊन सुद्धा सोयाबीन बेड वर असल्याने पिकावर परिणाम झाला नाही. उलट फुटव्यांची संख्या वाढली व कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी आहे.
श्रीकांत आखाडे, वालसावंगी ता. भोकरदन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com