
Kharif Season 2023 : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडेल अन् जळून चाललेली पिके, उसाला जीवनदान मिळेल तसेच शेतशिवार हिरवेगार होईल, या आशेने व्याकूळ होऊन बसलेल्या माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात जरी पावसाचे दमदार आगमन झाले असले तरी, अद्याप काही भागात रिमझिम पाऊस वगळता पेरण्याजोगा पाऊस पडला नसल्याने, शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर देखील होत असून, आर्थिक व्यवहार देखील मंदावल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
पावसाने यंदा चांगलीच ओढ दिली असली तरी, शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या पावसाची आशा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कायम आहे. पाऊस पडेल या आशेने शेतकरी शेतीची मशागत करून पेरणीसाठी गेल्या महिनाभरापासून आतुरतेने पावसाची वाट बघत आहे. परंतु आज-उद्या करत जवळपास पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप पेरण्याजोगा पाऊस पडलेला नाही.
शेतकरी चिंताग्रस्त असून, गेल्या आठवडाभरापासून आकाशात गडद ढग दिसू लागल्यामुळे काहीसा दिलासा वाटू लागला, परंतु आता आठवडा उलटला तरी, रिमझिम पाऊस वगळता एकही दमदार पाऊस नसल्याने संपूर्ण आर्थिक व्यवहार कोलमडून पडलेले आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने रिमझिम स्वरूपात या भागात हजेरी लावली. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी मात्र पूर्णपणे संकटात सापडला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.