Soybean Sowing : परभणी-हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीनची ५ लाख हेक्टरवर पेरणी

Kharif Soybean : या वर्षीच्या (२०२३) खरीप हंगामात शुक्रवार (ता. ४) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ५ लाख १० हजार ७३८ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे.
Maharashtra Soybean Sowing
Maharashtra Soybean SowingAgrowon

Parbhani News : या वर्षीच्या (२०२३) खरीप हंगामात शुक्रवार (ता. ४) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ५ लाख १० हजार ७३८ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी क्षेत्र २ लाख ४९ हजार ७२७ हेक्टर असतांना २ लाख ५८ हजार ६४० हेक्टर (१०३.५७ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख ५६ हजार ४०४ हेक्टर असतांना २ लाख ४२ हजार ९८ हजार हेक्टरवर (९८.३२ टक्के) पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात ८ हजार ९१३ हेक्टरने अधिक, तर हिंगोली जिल्ह्यात ४ हजार ३०६ हेक्टरने कमी पेरा झाला आहे.

सोयाबीनचा परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा या ६ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त, तर जिंतूर, पाथरी, सोनपेठ या ३ तालुक्यांत कमी पेरा झाला. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त तर हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांत कमी पेरा झाला आहे. यंदाच्या एकूण खरीप पेरणी क्षेत्रामध्ये परभणी जिल्ह्यात ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ४ लाख ९० हजार ९२६ हेक्टरवर (९१.७८ टक्के) पेरणी झाली आहे.

Maharashtra Soybean Sowing
Soybean Sowing : बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन उगवलेच नाही

कडधान्यांची ४४ हजार ४९० हेक्टर (५४.०१ टक्के) पेरणी झाली. त्यात तूर ३४ हजार ५९१ हेक्टर (७५.२६ टक्के), मूग ७ हजार १९५ हेक्टर (२६.४७ टक्के), उडदाची २ हजार ६७९ हेक्टर (२९.५० टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांत ज्वारी २ हजार १४९ हेक्टर (२९.३० टक्के), बाजर ४२५ हेक्टर (३६.३९ टक्के), मका ७११ हेक्टर (७०.८२ टक्के) पेरणी झाली. कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ८४ हजार १७८ हेक्टरवर (९५.८२ टक्के) झाली आहे.

Maharashtra Soybean Sowing
Soybean Sowing : खानदेशात सोयाबीन पेरणी स्थिर

हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ३ लाख ३१ हजार ५१७ हेक्टरवर (९१.८२ टक्के) कडधान्यांची ४३ हजार १६४ हेक्टर (७३.१७ टक्के) पेरणी झाली. त्यात तूर ३५ हजार १६ हेक्टर (७७.२९ टक्के), मूग ४ हजार ३३७ हेक्टर (५५.७३ टक्के), उडीद ३ हजार ६१२ हेक्टर (६१.४४ टक्के), ज्वारी ३ हजार २१४ हेक्टर (५८.३८ टक्के), बाजरी ११२ हेक्टर, तर मका ५७२ हेक्टर पेरणी झाली. कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी ३१ हजार ७९४ हेक्टर (८१.९० टक्के) लागवड झाली.

परभणी हिंगोली सोयाबीन पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ५०००० ५०७२२ १०१.४४

जिंतूर ५०३२० ५०३०८ ९९.९८

सेलू १८७४४ २२३२६ ११९.११

मानवत १४७५६ १५३४० १०३.९६

पाथरी १६५२४ १६२७६ ९८.५०

सोनपेठ १३६७५ १३६१५ ९९.५६

गंगाखेड २६२५८ २८१०२ १०७.०२

पालम २३३६५ २३९९८ १०२.७१

पूर्णा ३६०८३ ३७९५३ १०५.१८

हिंगोली ६२०१५ ५७३१२ ९२.४२

कळमनुरी ५२४३२ ५०४१० ९६.१४

वसमत ३१३२३ ४२३१६ १२६.९८

औढानागनाथ ४५५६३ ३९२०० ८६.०३

सेनगाव ६३०६९ ६२८६० ९९.९७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com