Kharif Season 2023 : पावसाअभावी पेरणी लांबणीवर

Kharif Sowing : अद्याप सर्वदूर पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी खरीप पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे.
Farmer
Farmer Agrowon
Published on: 
Updated on: 

अॅग्रोवन वृत्तसेवा
Kharif Sowing update : परभणी ः या वर्षीच्या (२०२३) पावसाळ्यात जून महिन्यात गुरुवार (ता. १५)पर्यंत परभणी जिल्ह्यात सरासरी १८.५ मिलिमीटर आणि हिंगोली जिल्ह्यात सरासरी १४.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या दोन जिल्ह्यांत अधूनमधून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे.

अद्याप सर्वदूर पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन,  तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी खरीप पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे. मात्र सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी लागवड केलेले कपाशीचे पीकवाढीच्या अवस्थेत आहे.

अनेक मंडळांतील जिरायती क्षेत्रात धूळपेरणीद्वारे कपाशीची लागवड (Cotton Cultivation) केली आहे. परंतु पावसाअभावी बियाण्याची उगवण झालेली नाही.

Farmer
पुरेशा पावसाअभावी पेरणी लांबणीवर

यंदा परभणी जिल्ह्यात ५ लाख ११ हजारांवर हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात गुरुवार (ता. १५)पर्यंत सरासरी ७२.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात सरासरी १८.५ मिमी पाऊस झाला आहे.

त्यात परभणी तालुक्यात सरासरी १८ मिमी, जिंतूर तालुक्यात ६.१ मिमी, सेलू तालुक्यात १९.९ मिमी, मानवत तालुक्यात ६.८ मिमी, पाथरी तालुक्यात ११.३ मिमी, सोनपेठ तालुक्यात ३२.८ मिमी, गंगाखेड तालुक्यात ४२.१ मिमी, पालम तालुक्यात २६.३ मिमी, पू्र्णा तालुक्यात १३ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात याच तारखेला जिल्ह्यात सरासरी ५६.४ मिमी पाऊस झाला होता.

गेल्या काही दिवसांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत आहे. परंतु पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. हिंगोली जिल्ह्यात यंदा ३ लाख ५४ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात गुरुवार (ता. १५)पर्यंत सरासरी ८४.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.

परंतु प्रत्यक्षात सरासरी १४.७ मिमी पाऊस झाला आहेत. त्यात हिंगोली तालुक्यात सरासरी ९.२ मिमी, कळमनुरी तालुक्यात सरासरी २२.९ मिमी, वसमत तालुक्यात सरासरी १६.१ मिमी, औंढा नागनाथ तालुक्यात सरासरी ९.५ मिमी, सेनगाव तालुक्यात सरासरी १४.९ मिमी पाऊस झाला आहे.

Farmer
Kharif Season 2023 : बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या

गतवर्षीच्या जून महिन्यात याच तारखेला जिल्ह्यात सरासरी ४१.३ मिमी पाऊस झाला होता.
परभणी जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे तसेच येलदरी सिद्धेश्‍वर कालव्याद्वारे आवर्तन सुरू असल्यामुळे लाभक्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी आदी तालुक्यांत, तर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी सिद्धेश्‍वर कालव्याच्या लाभक्षेत्रातील वसमत तालुक्यात अन्य स्त्रोस्रोतांद्वारे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.