Solar Project :सोलर प्रकल्पग्रस्तांचे चाळीसगावात आंदोलन

येत्या सात आक्टोबरपासून प्रकल्पासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पीडित शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीने लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला दिला आहे.
solar Project
solar ProjectAgrowon
Published on
Updated on

चाळीसगाव, जि. जळगाव : ‘‘शासनास सादर झालेल्या चौकशी अहवालावर सुनावणी घेऊन तत्काळ सोलर प्रकल्पावर (Solar Projects) कारवाई करा, अन्यथा येत्या सात आक्टोबरपासून प्रकल्पासमोर तीव्र आंदोलन छेडू,(Farmers Protest) असा इशारा पीडित शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीने लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला दिला आहे.

solar Project
Cotton Crop Management : बोंड अळी नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी ? | ॲग्रोवन

या संदर्भात संतप्त १५० ते २०० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत आपल्या कैफियत मांडली. चाळीसगाव तालुक्यातील बोढरे - शिवापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी अवाजवी दराने खरेदी करून सोलार कंपनीने शेतकऱ्यांवर अक्षरशः अन्याय केला.

solar Project
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी

त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या साठी गेल्या चार वर्षांपासून पीडित शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीकडून लढा सुरू आहेत. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीने अनेक वेळा मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलने केली. परंतु यापैकी २१ सप्टेंबर-२०२१ पासून सुरू झालेले बेमुदत धरणे आंदोलन यशस्वी ठरले होते.

त्यात चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तूर्तास स्थगित केले होते. या आंदोलनाला एक वर्षे पूर्ण होत आले आहे. तरीही शेतकरी अद्याप न्यायापासून वंचित आहे. त्यामुळे संतप्त १५० ते २०० शेतकऱ्यांनी चाळीसगाव गाठून तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, शासनाला सादर केलेल्या चौकशी अहवालावर तत्काळ सुनावणी घेऊन सोलर प्रकल्पावर कारवाई न झाल्यास येत्या ७ आक्टोबर-२०२२ पासून प्रकल्पासमोर तीव्र आंदोलन छेडू.

त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास फक्त शासन जबाबदार राहतील. निवेदनाची प्रत खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

या प्रसंगी शेतकरी बचाव कृती समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक काशिनाथ जाधव, बंजारा एकीकरण समितीचे प्रमुख देवेंद्र नायक, कांतिलाल राठोड, चत्रू राठोड, समितीचे अध्यक्ष भरत चव्हाण, अनिल राठोड आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com