Solapur APMC Result : पंढरपूर, अकलूज, मोहोळ, मंगळवेढा कुर्डूवाडीत गड राखले

अक्कलकोट, दुधनी भाजपकडे, सांगोल्यात सर्वपक्षीय आघाडीला कौल
Solapur APMC Result
Solapur APMC Result Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (APMC) निवडणुकांचे निकाल हाती आले असून, यामध्ये पंढरपूर, अकलूज, कुर्डुवाडी आणि मोहोळमध्ये सत्ताधाऱ्यांनी आपापले गड राखले आहेत.

तर अक्कलकोट आणि दुधनी बाजार समितीवरील (Dudhani Market Commttee) काँग्रेस नेते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अनेक वर्षांच्या एकहाती सत्तेला आव्हान देत भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी पहिल्यांदाच विजय खेचून आणला.

मंगळवेढ्यात पुन्हा आवताडे गटानेच बाजी मारली, तर सांगोल्यात सर्वपक्षीय आघाडीकडे सत्ता गेली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातच मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ बाजार समितीच्या सर्व १८ जागा बिनविरोध निवडून आणून आपला गड कायम ठेवण्यात यश मिळवले.

पण दुसरीकडे मोहिते पाटील गटाला विरोधासाठी अकलूज बाजार समितीवर विरोधकांनी चांगली मोट बांधत मोहिते पाटलांना, तर कुर्डुवाडी बाजार समितीत आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजय शिंदे यांना विरोधकांनी जोरदार आव्हान दिले.

Solapur APMC Result
Solapur APMC : सोलापूर बाजार समितीकडून संचालक मुदतवाढीचा प्रस्ताव

पण या दोन्ही ठिकाणी विरोधकांचा बार फुसका ठरला. कुर्डुवाडी बाजार समितीवर सर्वच्या सर्व १८ जागा मोठ्या मतांच्या फरकाने जिंकत शिंदे बंधूंनी आपली सत्ता कायम ठेवली. अकलूजला मोहिते पाटील गटाने १८ पैकी १७ जागा जिंकत वर्चस्व मिळवले.

मात्र, इथे विरोधी गटाचे नेते आणि मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर यांनी एका जागेवर विजय मिळवत पहिल्यांदाच बाजार समितीत प्रवेश केला. जानकरांचा हा विजय मोहिते पाटलांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

पंढरपुरातही सत्ताधारी माजी आमदार प्रशांत परिचारक गटाला विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आव्हान दिले. पण या आधीच ५ जागा बिनविरोध करून परिचारक यांनी आघाडी घेतली होती.

उर्वरित १३ जागांवरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याणराव काळे आणि भगिरथ भालके यांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने सर्व १७ जागा जिंकत पुन्हा एकदा आपले वर्चस्व त्यांनी सिद्ध केले.

Solapur APMC Result
APMC Election : पंढरपूर, अकलूज, सांगोल्यासह आठ बाजार समित्यांची निवडणूक जाहीर

मंगळवेढ्यात ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे आणि आमदार समाधान आवताडे या काका-पुतण्याने सर्व १७ जागांवर विजय मिळवत पुन्हा सत्ता आपल्याकडे कायम ठेवत आपली ताकद दाखवून दिली.

सांगोल्यात शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा सर्वपक्षीय आघाडीने सत्ता मिळवली. इथे सत्ताधारी शेकापने बेरजेचे राजकारण केल्याचे बोलले जाते.

अक्कलकोट, दुधनीमध्ये परिवर्तन
अक्कलकोट आणि दुधनीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी काँग्रेसचे नेते, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना चांगलेच आव्हान दिले.

गेली अनेक वर्षे अक्कलकोट आणि दुधनी बाजार समितीवर म्हेत्रे गटाची एकहाती सत्ता होती. अद्याप तिथे परिवर्तन झाले नव्हते. पण यंदा कल्याणशेट्टी आणि पाटील यांनी चांगलाच जोर लावल्याने या दोन्ही बाजार समित्यांत भाजपने विजय खेचून आणला.  

सत्तेत भाजपचा वरचष्मा
जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांवरील पक्षीय बलाबलाचा विचार करता पंढरपूर, अकलूज, अक्कलकोट आणि दुधनी या चार बाजार समित्यांवर एकहाती सत्ता मिळवत भाजपने आपला वरचष्मा ठेवला आहे.

तर मोहोळ आणि कुर्डुवाडी या दोन बाजार समित्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवल्या. सांगोल्यात सर्वपक्षीय आघाडी आणि मंगळवेढ्यात आवताडे गटाकडे बाजार समिती गेली आहे.

पण मंगळवेढ्यातही आमदार समाधान आवताडे यांच्या गटाचे अर्थात भाजपचे उमेदवार आहेत. एकूणच निवडणूक लागलेल्या बाजार समितीत सर्वाधिक जागांवर भाजपने आघाडी घेतल्याचे दिसते.


Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com