Bullock : गोऱ्ह्यांची जोडी पाहताच.. मायमाऊलीचे डोळे पाणावले !

Paddy Farming : २९ जुलैचा तो प्रसंग अत्यंत कठीण होता... भात शेतीत चिखलणी सुरू असताना विजेच्या खांबात करंट उतरून डोळ्या देखत बैलजोडी अपघाती गेली होती.
Bullock
BullockAgrowon
Published on
Updated on

Pune News : दारापुढं नव गोऱ्ह्यांची जोडी पाहताच.. त्या शेतकऱ्याच्या वृद्ध मायमाऊलीचे डोळे पाणावले. दारी आलेल्या वृषभ राजाच्या पायी जल टाकून, गंध ओवाळून तिने स्वागत केलं तेव्हा अवघा क्षण गहिवरला..! कारण ही तसेच होते...

२९ जुलैचा तो प्रसंग अत्यंत कठीण होता... भात शेतीत चिखलणी सुरू असताना विजेच्या खांबात करंट उतरून डोळ्या देखत बैलजोडी अपघाती गेली होती. या शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

मनात दु:ख, निराशेने घर केलेलं असतानाच कोसो दूर ही सहवेदना काही तरुणांच्या संवेदनशील हृदयाला भिडली. एका मित्राने हा प्रसंग समाजमाध्यावरील ग्रुपमध्ये कळविल्यावर काही क्षणात नवी बैलजोडी घेऊन देण्याची तयारी झाली.

Bullock
Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीवर चित्रपट येणार! अमोल कोल्हेंनी केली घोषणा...

दुर्गम भागातील मुथाळणे (ता.जुन्नर) गावातील पुताचीवाडी या आदिवासी पाड्यावरील शेतकरी भीमा विठ्ठल दाभाडे हे त्या दिवशी भात लावणीचे काम करत होते. दुपारी जेवणासाठी थांबल्यावर बैलांना शेताच्या बांधावरील विजेच्या खांबाला बांधले. जेवण करत असताना, अचानक विद्युत पुरवठा सुरू होऊन वीज खांबात उतरली आणि या धक्क्याने डोळ्यासमोर क्षणार्धात दोन्ही बैलांचा तडफडून मृत्यू झाला होता. बैलांच्या अंत्यविधीसाठी देखील उसनवारी करून अंत्यविधी केले होते.

ही घटना सामाजिक काम करणाऱ्या अनिल साबळे या तरुणास कळाली, त्यांनी मित्रवर्य प्रशांत कुलकर्णी यांना सांगितली. प्रशांत यांनी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील ११वीच्या शालेय मित्रांच्या समाजमाध्यमातील ग्रुपवर ही घटना ‘शेअर’ केली. ग्रुप संवेदनशिल मित्रांनी काही क्षणात ५० हजार रुपये गोळा झाले आणि बैलजोडी देण्याचा निर्णय घेतला.

Bullock
Bullock Cart Race : बैलगाडी शर्यतीचं आयोजन करायचंय ? मग हे नियम वाचाच...

प्रशांत आणि मित्र अजय आवारे यांनी आळेफाटा येथे जाऊन दोन गोऱ्हे खरेदी केले आणि थेट शेतकऱ्याच्या दारासमोर उभे केले. नवीन गोऱ्हांची जोडी बघून शेतकरी आणि त्याच्या वृद्ध आईच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आनंदाश्रू तरळत होते. त्या मायमाऊलीने लगेच पूजेचे ताट करून गोऱ्हे पुजले आणि श्रीखंड पुरीचे जेवण करून उपस्थित सर्वांचे आदरातिथ्य केले.

या उपक्रमासाठी डॉ. अर्चना अग्रवाल, डॉ रूपा नेवे, मेधा शेळके, पूजा धात्रक, अजून एक डॉ. अर्चना अग्रवाल, डॉ. संजय पठारे, अजय आवारे, दीपाली लाभे, थेट परदेशातून अनिल रोहम आदींनी तत्परतेने पैसे दिले.

वाढदिवसाचा असाही योगायोग..

ज्यादिवशी बैलजोडी देण्यात आली त्याच दिवशी पिंपळे सौदागरच्या प्रशांत कुलकर्णी यांचा वाढदिवस होता. माझ्या आयुष्यातील सर्वात हृद्य वाढदिवस माय माऊलींच्या आनंदाने साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले. श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी आणि वरणभात असा अफलातून बेत त्यांनी जेवायला केला होता. तो कोणत्याही वाढदिवसाच्या पार्टी पेक्षा भन्नाट असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com