Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीवर चित्रपट येणार! अमोल कोल्हेंनी केली घोषणा...

Supreme Court on bullock cart races : सर्वोच्च न्यायालायने बैलगाडी शर्यतीवर अंतिम निकाल दिला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचे शौकिनांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार मोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे.
Bullock Cart Race
Bullock Cart Raceagrowon

film base on bullock cart races : बैलगाडी शर्यतीच्या परवानगीवर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर शौकिनांनी आनंद व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते मोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीवर चित्रपट येणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात Bullock Cart शर्यतींना सर्वाेच्च न्यायालयाची सशर्त परवानगी । Agrowon | ॲग्रोवन

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना अमोल कोल्हे यांनी सांगितले केली, याचसाठी केला होता अट्टाहास, ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक बैलगाडा मालकाचं, शौकिनांचं आणि प्रेमींचं हे मोठं यश आहे. यातून परंपरेचं जतन होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचंही ते म्हणाले.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील म्हणाले, " सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना जे अपेक्षित होतं तो निर्णय घेतला. आता देशातील वन्य प्राणी संरक्षण कायदाही रद्द व्हावा. तसेच गोवंश हत्या बंदीचा कायदाही रद्द झाला पाहिजे, कारण हे कायदे शेतकऱ्यांना न्याय करणारे आहेत."

Bullock Cart Race
शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे

चित्रपटाची घोषणा करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "बैलगाडी शर्यतीवर चित्रपट काढण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच हा दिमाखदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बैलगाडा मालकाचे कष्ट, त्यांचं बैलांसोबत असलेलं नातं हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे." यासंदर्भात मागील अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दबावतंत्र वापरलं जातं आहे. हे अनेक वर्ष संसदेत हा विषय मांडताना मी अनुभवत आहे. या आंतरराष्ट्रीय दबावतंत्राचा देखील बुरखा पाडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, "काही गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी मांडाव्या लागतात. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका १५७ देशांमध्ये पोहोचली. त्यावेळी संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरातील मुलांपर्यंत पोहोचला. त्यानंतर शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने प्रत्येक शहरात मोठ्या संख्येने प्रेक्षक इतिहास अनुभवत आहे. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे. ती याच पद्धतीने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विदेशी लोक येतील आणि या शर्यतीचा एक मोठा सोहळा होईल, अशा पद्धतीने हा चित्रपट तयार केला जाणार आहे."

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com