Mahabeej : ‘महाबीज’ संचालकपदी सहाव्यांदा वल्लभराव देशमुख विजयी

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत वल्लभराव देशमुख उर्वरित महाराष्ट्र मतदार संघातून विक्रमी सहाव्यांदा विजयी झाले. तर विदर्भ मतदार संघात डॉ. रणजित सपकाळ यांनी बाजी मारली.
Mahabeej
MahabeejAgrowon
Published on
Updated on

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) (Mahabeej) दोन संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत वल्लभराव देशमुख (Vallabhrao Deshmukh) उर्वरित महाराष्ट्र मतदार संघातून विक्रमी सहाव्यांदा विजयी झाले. तर विदर्भ मतदार संघात डॉ. रणजित सपकाळ (Dr. Ranjit Sapkal) यांनी बाजी मारली. दोघांचे विजय अपेक्षित धरले जात होते.

Mahabeej
Mahabeej Soybean Seed Rate वाढल्याने शेतकरी अडचणीत|Soybean Bajarbhav|Agrowon|

गुरुवारी (ता. २२) सायंकाळी उशिरा या दोन्ही जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. ‘महाबीज’च्या दोन संचालक पदांच्या निवडीसाठी अकोला (विदर्भ) आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदार संघात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. विदर्भ मतदार संघातून अकोला येथील खासदार संजय धोत्रे यांचे निकवर्तीय डॉ. रणजित सपकाळ यांनी ८९६२ मते घेत विजय मिळविला.

Mahabeej
Mahabeej Soybean Seed Rate वाढल्याने शेतकरी अडचणीत|Soybean Bajarbhav|Agrowon|

गुरुवारी (ता. २२) सायंकाळी उशिरा या दोन्ही जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. ‘महाबीज’च्या दोन संचालक पदांच्या निवडीसाठी अकोला (विदर्भ) आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदार संघात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. विदर्भ मतदार संघातून अकोला येथील खासदार संजय धोत्रे यांचे निकवर्तीय डॉ. रणजित सपकाळ यांनी ८९६२ मते घेत विजय मिळविला.

Mahabeej
Soybean Seed Rate मध्ये महाबीजकडून वाढ|Soybean Seed|Agrowon

त्यांनी अकोला येथीलच प्रशांत विश्वासराव गावंडे यांचा पराभव केला. गावंडे यांना दोन हजार ३२१ मते मिळाली. २०७ मते बाद ठरली. उर्वरित महाराष्ट्र मतदार संघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील वल्लभराव देशमुख यांनी विजय मिळविला. त्यांना ५६६६ मते मिळाली.

त्यांनी बीड जिल्ह्यातील ॲड. विष्णुपंत सुभानराव सोळंके यांचा पराभव केला. ॲड. सोळंके यांना ३३०९ मते मिळाली. या मतदार संघात २६५ मते बाद झाली. मतपत्रिकेद्वारे ही निवडणूक घेण्यात आली. यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत मतपत्रिका स्वीकारण्यात आल्यानंतर अकोला येथील मुख्यालयात १५ सप्टेंबरपासून मतपत्रिकांची छाननी व पात्र मतपत्रिकांची यादी तयार करण्याचे काम सुरू होते.

बुधवारी (ता. २१) हे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी मोजणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com