Dam Water Pune : पुणे जिल्ह्यात जून महिन्यात साडेसहा टीएमसी पाणीसाठा

Dam Water Level : घाटमाथ्यावर बऱ्यापैकी जोरदार पाऊस पडत असल्याने धरणसाठ्यांत हळूहळू वाढ होत आहे. जून महिन्यात जिल्ह्यातील धरणांत ६.५१ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.
dam Water
dam Water Agrowon
Published on
Updated on

Pune News : घाटमाथ्यावर बऱ्यापैकी जोरदार पाऊस पडत असल्याने धरणसाठ्यांत हळूहळू वाढ होत आहे. जून महिन्यात जिल्ह्यातील धरणांत ६.५१ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे १८.३९ टीएमसी म्हणजेच ९ टक्के एवढा पाणीसाठा धरणात झाला आहे. चालू महिन्यात चांगला पाऊस झाल्यास धरणांतील पाणीपातळीत आणखी वाढ होईल.

मॉन्सून दाखल झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला होता. साधारणपणे २३ जूनपासून वातावरणात वेगाने बदल झाल्यानंतर पावसास सुरुवात झाली. सुरुवातीचे दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कमी होता. त्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला. जिल्ह्यात २५-२६ जूनपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.

dam Water
Jalgaon Water Dam : हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांचे दरवाजे बंद

आत्तापर्यंत काही धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडला असला तरी बहुतांश धरणक्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही. मात्र, मागील आठ ते दहा दिवसांत धरणक्षेत्रात ६१ मिलिमीटरपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली होती. तर, घाटमाथ्यावर अति जोरदार पाऊस पडल्याने बऱ्यापैकी धरणांत आवक सुरू झाली होती.=

जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. उजनी धरणक्षेत्रात गेल्या जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक असले तरी पश्चिमेकडील घाटमाथ्यावर गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी अधिक पाऊस पडला आहे.

यंदा लोणावळ्याच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक ५५२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर, वळवण घाटमाथ्यावर ४३७ मिलिमीटर, मुळशी ४१७, शिरोटा ३८५, कुंडली ३७९, ठोकरवाडी २४५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांत १.८३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

dam Water
Dam Water Stock : धरणांत पाण्याची आवक सुरू

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यंदाही कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला असला तरी टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जूनमध्ये सर्वाधिक ४१६ मिलिमीटर पाऊस पडला. तर वडिवळे धरणक्षेत्रात ३७८ मिलिमीटर, पवना ३७५,

वरसगाव ३०२, पानशेत २८४, नीरा देवघर २७८, कळमोडी २४८ मिलिमीटर पाऊस पडला. भामा आसखेड धरण क्षेत्रात १७१ मिलिमीटर, कासारसाई १५३ मिलिमीटर, आंध्रा १५५, चासकमान ११२, खडकवासला १०७, गुंजवणी ११९, भाटघर ११०, पिंपळगाव जोगे १०४, माणिकडोह १०५ मिलिमीटर पाऊस पडला. तर शेटफळ, नाझरे, वीर, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड, विसापूर या धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असून येथे १०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला

एक ते ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील धरणांत झालेली पाण्याची आवक (टीएसीमध्ये)

टेमघर ०.१२, वरसगाव ०.४९, पानशेत ०.४६, खडकवासला ०.४१, पवना ०.२४, कळमोडी ०.३१, चासकमान ०.३६, भामा आसखेड ०.२४, आंध्रा ०.१४, वडिवळे ०.०७, गुंजवणी ०.०९, भाटघर ०.९५, नीरा देवघर ०.५९, वीर ०.५७, पिंपळगाव जोगे ०.३६, माणिकडोह ०.२०, येडगाव ०.२७, डिंभे ०.५१, विसापूर ०.१०, उजनी ०.३६, मुळशी १.०.२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com