Banana Disease : केळीच्या ३२ हजार हेक्टर बागांवर करपा रोगाचा कहर

३० ते ३२ टक्के प्रादुर्भाव; तापमानात घट झाल्यास हानी वाढणार
Disease of banana | Banana Disease
Disease of banana | Banana DiseaseAgrowon
Published on
Updated on

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशातील सुमारे ३२ हजार हेक्टरवरील केळी बागेत करपा रोगाचा (Sigatoca Disease) कहर झाला आहे. यामुळे बागांचे ३० ते ३५ टक्के नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर कुकुंबर मोझॅक (Cucumber Mosaic) विषाणूच्या समस्येनंतर करपा रोगाचे नवे संकट उभे ठाकले आहे.

Disease of banana | Banana Disease
Banana Rate : नवरात्रीमुळे केळीच्या दरात सुधारणा

जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, भडगाव, पाचोरा, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा, शहादा भागांत केळीवर करपा रोग दिसत आहे. पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तथा प्रभारी प्रमुख महेश महाजन, विषय विशेषज्ञ अतुल पाटील, कृषी सहायक संदीप बारेला यांनी या बाबत रावेरातील कुसुंबा, कुंभारखेडा, उटखेडा भागांत पाहणी केली असून, केळीवर करपा रोग वाढत असल्याचे म्हटले आहे.

Disease of banana | Banana Disease
Sigatoka Disease : केळीवर सीगाटोका रोगाचा प्रादुर्भाव का होतो ? | ॲग्रोवन

या पाहणीत शास्त्रज्ञांना निसवलेल्या नवती किंवा मृग बहर (मे ते जुलैदरम्यान लागवडीच्या केळी बागा) केळी बागेतील केळी झाडांची खालच्या भागातील तीन ते चार पाने करपा रोगामुळे पूर्ण वाळल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक पाने पिवळी होत आहेत. हा प्रादुर्भाव तापमानातील घसरणीने वाढला आहे. यात बागांचे आजघडीला ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे, असा निष्कर्ष काढला आहे.

Disease of banana | Banana Disease
Banana Disease : केळीवरील सिगाटोका रोगाची लक्षणे कशी ओळखायची?

जामनेर, यावल, मुक्ताईनगर, तळोदा, अक्कलकुवा, शहादा भागांत मे ते जूनदरम्यान लागवडीच्या बागांत तर जळगाव, चोपडा, शिरपूर, भडगाव, पाचोरा भागात सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान लागवडीच्या बागा (कांदेबाग केळी) करपा रोगाला बळी पडल्या आहेत. मागील तीन दिवसांत हा रोग वाढला आहे. खानदेशात सातपुडा पर्वतात व तापी, गिरणा नदीच्या क्षेत्रात किमान तापमान पाच अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी राहत आहे.

सातपुड्यालगत रावेर, यावल, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, शिरपूर, तळोदा, अक्कलकुवा, शहादा या भागांतच हा रोग अधिक आहे. या तालुक्याचा मोठा भाग तापी नदीलगत देखील आहे. दिवसा आर्द्रता व रात्री थंडी यामुळे केळी बागा करपा रोगास बळी पडल्याचे दिसत आहे. निसवलेल्या न केळी बागांत अधिक नुकसान होईल. कारण घडाची वाढ कमी होईल. त्याचा दर्जा राखण्यासाठी कीडनाशकांचा उपयोग वाढेल. यात केळी उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढेल, अशी स्थिती आहे.

खानदेशात मागील पाच ते सहा दिवसांत थंडी बऱ्यापैकी जाणवत आहे. पुढे तापमान आणखी घसरल्यास केळी बागांत करपा रोगाची समस्या आणखी वाढून नुकसानीची पातळीदेखील वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


जळगाव जिल्ह्यात रावेर व इतर भागात केळीवर थंडी वाढल्यानंतर करपा येत असतो. यंदाही हा रोग आला आहे. पण भीतीचे कारण नाही. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार फवारणी करावी. जळगाव येथील केळी संशोधन केंद्र या रोगासंबंधी नंदूरबारसह जळगाव, रावेर व इतर भागांत जनजागृती करीत. शेतकरीदेखील आता या रोगाचा अटकाव करण्यासंबंधी प्रशिक्षित झाले आहेत.
- डॉ. चंद्रशेखर पुजारी, प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव



करपा रोग रावेर, यावल भागांत आहे. रोगग्रस्त केळी बागांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. तसेच जमिनीवर एक टक्का बोर्डो मिश्रण करून फवारणी घ्यावी. रात्री बागेभोवती शेकोट्या कराव्यात.
- महेश महाजन, प्रभारी प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com