Gokul Dudh Kolhapur : 'गोकुळचे दूध संकलन का वाढत नाही', नेत्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची वरिष्ठ नेत्यांकडून काल(ता.३०) आढावा बैठक घेण्यात आली.
Gokul Dudh Kolhapur
Gokul Dudh Kolhapuragrowon

Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकीत असलेल्या गोकुळ दूध संघाची वरिष्ठ नेत्यांकडून काल(ता.३०) आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये पार पडली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आ. सतेज पाटील यांच्यासह अध्यक्षांसह अन्य संचालक मंडळ उपस्थित होते. दरम्यान बैठकीत गोकुळच्या दूधवाढीबाबत घमासान चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान जिल्हा बँकेकडून म्हैस खरेदी करण्यासाठी कर्ज प्रकरणे केली जात आहेत. या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी जिल्हा बँकेत बैठक घेण्याचे ठरले. दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी नवीन प्रकरणे किती झाली. याचा आढावा जिल्हा बँकेच्या होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

गोकुळच्या दूध संकलनात घट होत आहे. या मुद्द्यावर या बैठकीत जोरदार चर्चा झाली. यामध्ये मंत्री मुश्रीफ व आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत खरपूस समाचार घेतला. स्पर्धक खासगी संघाने जिल्ह्यातून दूध संकलन सुरू केले आहे. गोकुळपेक्षा लिटरला जादा दर देऊन उत्पादकांना हे संघ आपल्याकडे वळवत आहेत. गोकुळचे अधिकारी काय करत आहेत अशी माहिती समोर आली.

गोकुळकडे सभासद असलेल्या काही दूध संस्थांनी गोकुळकडे कमी आणि खासगी दूध संघाकडे जादा दूध पाठवणे सुरू केले आहे. यामुळे गोकुळच्या दूध संकलनात घट होत आहे. याकडे संघाचे अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने लक्ष देणे गरजचे आहे, अशी सूचना मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Gokul Dudh Kolhapur
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या बंडामुळे गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समित्यांचा राजकीय पॅटर्न बदलणार?

पशुखाद्यावर चर्चा

याचबरोबर माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले की, उत्पादकांच्या मागणीनुसार पशुखाद्याचे उत्पादन वाढवले आहे. दुसऱ्या बाजूला मागणीत घट झाली आहे. जिल्ह्यात अनेक प्राथमिक दूध संस्थांकडून पशुखाद्याची मागणीच होत नाही, ही बाब फारच गंभीर आहे.

यासंदर्भात किती संस्था पशुखाद्य मागणी करत नाहीत, त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी केल्या. आ. पाटील यांनी संघाच्या कामात तातडीने सुधारणा करा, दूध संकलन वाढले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com