Gram Panchayat Election : रत्नागिरीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बाजी

रत्नागिरी : जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जिल्ह्यात पुन्हा वर्चस्व पुन्हा सिद्ध करीत भगवा फडकवला. तब्बल १०१ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले.
Udhhav Thackeray
Udhhav ThackerayAgrowon
Published on
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत (Gram Panchayat Election) शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena Udhhav Thackeray) गटाने जिल्ह्यात पुन्हा वर्चस्व पुन्हा सिद्ध करीत भगवा फडकवला. तब्बल १०१ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. खेड मतदारसंघात योगेश कदम यांनी जोरदार मुसंडी मारली तर रत्नागिरीतही पालकमंत्री सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला जेरीस आणले. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने वरील दोन्ही मतदारसंघांत मोठी उडी घेतली आहे. भाजपने १९ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.

Udhhav Thackeray
Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात भाजप, ‘वंचित’ची बाजी

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने १०१ ग्रामपंचायतींवर तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने ४५ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. भाजपने १९ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असून, राष्ट्रवादीच्या खात्यात ८ तर काँग्रेसने ३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. गावपॅनलने ४५ ठिकाणी वर्चस्व राखले.

Udhhav Thackeray
Grampanchyat Election : कोल्हापुरात सत्तांतराला कौल

दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघात आमदार योगेश कदम यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. परंतु निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. ३० ग्रामपंचायती शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडे आल्याचे बोलले जात आहे. यामध्ये दापोलीत २२ ग्रामपंचायती, मंडणगडमध्ये सहा तर खेडमध्ये दोनवर योगेश कदम यांनी वर्चस्व राखले.

Udhhav Thackeray
Gram Panchayat Election : गावगाड्याचा संदेश

गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व सिद्ध करत १४ पैकी ८ ग्रामपंचायतींवर निर्विवाद विजय मिळवला. तर भाजपला दोन, गाव विकास पॅनलला ३ तर महाविकास आघाडीला १ ग्रामपंचायत जिंकता आली. उर्वरित सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

चिपळूणमध्ये ३२ पैकी १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. २० पैकी गाणे ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने याठिकाणी मतदान झाले नाही. उर्वरित १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने वर्चस्व राखत ८ ते ९ ग्रामपंचायतींत तर राष्ट्रवादीने ४ आणि उर्वरित ग्रामपंचायतींत गावविकास पॅनलने बाजी मारली.

रत्नागिरीमध्ये पालकमंत्री सामंत विरोधात उद्धव ठाकरे गटात मोठी चुरस पहायला मिळाली. २९ पैकी २३ साठी सरपंच तर २५ ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी निवडणूक झाली. सरपंचांपैकी ११ जागांवर उद्धव ठाकरे गटाने दावा केला तर १० वर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने वर्चस्व सांगितले आहे. भाजपने ४ ग्रामपंचायती जिंकतानाच तब्बल ५८ सदस्य निवडून आणल्याचे स्पष्ट केले. ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. संगमेश्वर तालुक्यातही उद्धव ठाकरे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले. या ठिकाणी राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने २ ग्रामपंचायती घेत खाते उघडले. लांजा व राजापूरमध्ये आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व राखले.

आमदारांचे वर्चस्व कायम

जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळाली. जिल्ह्यात प्रत्येक आमदाराने आपले वर्चस्व राखले असले तरी चिपळूण-संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे गटाने शह दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com