Andheri Election : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचे शक्तिप्रदर्शन

भाजपच्या उमेदवारासाठी शिंदे गटाचे नेते सरसावले
Andheri Election
Andheri ElectionAgrowon

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी, तर भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. लटके यांचा अर्ज भरण्यासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे, (Aditya Thakrey) अनिल परब,(Anil Parab) प्रियांका चतुर्वेदी तर पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, कृपाशंकर सिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे उपस्थित होते.

Andheri Election
Crop Damage : परतीच्या पावसानं सर्वदूर हाहाकार उडाला | ॲग्रोवन

लटके या आपल्या निवासस्थापासून अर्ज भरण्यासाठी तीन किलोमीटर पायी गेल्या. यादरम्यान शिवसैनिकांनी मोठी गर्दी करत पदयात्रा काढली. ठिकठिकाणी मशाल हे चिन्ह दाखवत शिंदे गट आणि भाजपला आव्हान दिले. मुरजी पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने न स्वीकारल्याने भाजपनेही आपला उमेदवार निश्चित झाला असला तरी जाहीर केला नव्हता.

Andheri Election
Crop Insurance : नुकसान होऊनही विमा कंपन्यांना सूचना नाही, मदतीसाठी अडचण

मात्र मुरजी पटेल यांनी याआधीच प्रचार सुरू केला आहे. लटके यांचा राजीनामा लटकल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलेच सुनावत आपल्याच कर्मचाऱ्याशी आपण अशा प्रकारे वागत आहात. एक कर्मचारी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवू इच्छित असेल तर तुम्ही राजीनामा स्वीकारणार की नाही याबाबत काहीच सांगत नाही, हे लक्षण ठीक नाही.

राजीनामा स्वीकारण्याचे विशेषाधिकार महापालिका आयुक्तांना असताना यावर निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल केला होता. तसेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता राजीनामा स्वीकारून राजीनामापत्र सादर करण्याचे आदेशही दिले होते. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र हातात पडताच लटके यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली. शिवसेनेच्या वतीने संदीप नाईक यांचाही अर्ज दाखल केला आहे.

राजीनामा लवकर न स्वीकारल्याचा फायदा?

आमदार रमेश लटके हे अंधेरी पूर्व मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. लटके हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील होते. प्रचंड जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. नगरसेवक ते आमदार अशी चढती कमान राहिलेल्या लटके यांचा काही महिन्यांपूर्वी दुबई येथे सहकुटुंब पर्यटनासाठी गेल्यानंतर ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी ऋतुजा या महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत होत्या.

त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी ३ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला. मात्र त्यांच्याविरोधात अंधेरी येथील एका नागरिकाने १२ ऑक्टोबर रोजी भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली. हाच मुद्दा महापालिकेच्या वकिलाने सुनावणीदरम्यान उपस्थित केला. मात्र ही तक्रार दाखल करण्यामागे भाजपचा हात आहे, असा आरोप शिवसेना करत आहे.

या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नाही. मात्र पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. लटके यांचा राजीनामा न स्वीकारल्याने प्रकरण उच्च न्यायालयात गेले. परिणामी, लटके या गेले दोन दिवस माध्यमांमध्ये झळकत आहेत.

मुरजी पटेल यांनी प्रचार सुरू केला असला, तरी लटके या विनासायास माध्यमांमुळे घरोघरी पोहोचल्या. तसेच मशाल हे चिन्हही यानिमित्ताने चर्चेत राहिले. त्यामुळे राजीनामा न स्वीकारण्याचे महापालिकेचे पाऊल लटके यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com