
Nagar News : गेल्यावर्षी कापसाचे दर पडले, अगदी महिनाभरापर्यंत कापसाची शेतकरी विक्री करत होते. गेल्या वर्षी कापसाला दर मिळाला नाही, लावगडीच्या काळातही पाऊस नव्हता, त्यामुळे कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना यंदाही कापसाच्या लागवडीने सरासरी ओलांडली आहे. यंदा आतापर्यंत नगर जिल्ह्यात १ लाख ४९ हजार ३२७ हेक्टरवर लागवड झाली असून, यंदा सर्वाधिक शेवगाव तालुक्यात ४६ हजार ७८१ हेक्टरवर कापूस लावला आहे.
पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने मात्र बहुतांश भागात कापसाची वाढ खुंटली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी यंदा १८ हजार हेक्टर क्षेत्रावर अधिक कापूस लागवड झाली. गतवर्षी १ लाख ३१ हजार ९६२ हेक्टरवर लागवड झाली होती.
जिल्ह्यात खरिपाचे पाच लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पूर्वी खरिपात सर्वाधिक बाजरीचे क्षेत्र असायचे. आता ते कमी होऊन कापूस, सोयाबीन वाढले आहे. यंदा सोयाबीनची १ लाख ७८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढत आहे.
मराठवाड्याला लागून असलेल्या शेवगाव, पाथर्डी, तालुक्यांत पूर्वीपासून कापसाचे उत्पादन घेतले जायचे. मात्र आता अलीकडच्या काळात कर्जत, नगर, श्रीगोंद्यासह उसाचा पट्टा असलेल्या राहाता, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, नेवासा भागातही कापसाची लागवड वाढत आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी या तालुक्यांत कापसाचे सर्वाधिक क्षेत्र असून, यंदाही या तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक लागवड झाली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, कर्जत,
श्रीगोंदा तालुक्यांत कापसाचे क्षेत्र कमी असले, तरीही यंदा सरासरीपेक्षा अधिक कापूस लागवड झाली आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला उशिराने पाऊस आला. त्यानंतरही अजून अनेक भागांत पुरेसा पाऊस नाही. त्याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. कापसाची वाढ खुंटली आहे. शिवाय पाते लागण्याही उशीर होत आहे. त्यामुळे यंदाही आर्थिक फटका सोसावा लागणार असल्याचे दिसतेय.
गेल्या वर्षी सुरुवातीला कापसाला चांगला दर होता, मात्र त्यानंतर दरात घसरण झाली. दर आशेने अगदी जूनपर्यंत कापूस ठेवला, परंतु उपयोग झाला नाही. तरीही यंदा कापसाची लागवड गतवर्षीपेक्षा वाढली आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही कापसाचे पीक अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे.
तालुकानिहाय कापूस लागवड
नगर ११२१
पारनेर ११६
श्रीगोंदा ६,८२७
कर्जत ५,४५९
जामखेड २७४
शेवगाव ४६,७८१
पाथर्डी ३३,३०५
नेवासा २८,९६७
राहुरी १५,३५१
संगमनेर २७३६
अकोले ०
कोपरगाव १६७१
श्रीरामपूर ५३९४
राहाता १३३४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.