Cotton Sowing : सात तालुक्यांत कपाशीच्या क्षेत्रात वाढ

Kharif Sowing : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत या वर्षीच्या (२०२३) खरीप हंगामात शुक्रवार (ता. १०) पर्यत कपाशीची २ लाख २२ हजार ४१९ हेक्टरवर लागवड झाली आहे.
Cotton Sowing
Cotton Sowing Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत या वर्षीच्या (२०२३) खरीप हंगामात शुक्रवार (ता. १०) पर्यत कपाशीची २ लाख २२ हजार ४१९ हेक्टरवर लागवड झाली आहे.

परभणी जिल्ह्यात कपाशीचे सरासरीक्षेत्र १ लाख ९२ हजार २१३ हेक्टर असून, १ लाख ९० हजार २१० हेक्टर (९८.७८ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ३८ हजार ८२१ हेक्टर असतांना ३२ लाख २०९ हेक्टरवर (८२.९७ टक्के) लागवड झाली आहे.

या दोन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे. परंतु जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम, हिंगोली, औंढा नागनाथ या ७ तालुक्यांमध्ये कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

परभणी जिल्ह्यात यंदा शुक्रवार (ता. १०) च्या कृषी विभागाकडील नोंदीनुसार एकूण खरीप पिकांची ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ५ लाख ६ हजार १६१ हेक्टरवर (९४.६३ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात कपाशीचे लागवड क्षेत्र ३७.५७ टक्के म्हणजेच १ लाख ९० हजार २१० हेक्टर आहे. सोयाबीनची २ लाख ६५ हजार ३२८ हेक्टरवर (१०६.२५ टक्के) पेरणी झाली असून, एकूण पेरणीक्षेत्रात सोयाबीनचे क्षेत्र ५१.४१ टक्के आहे.

Cotton Sowing
Cotton Sowing : पंजाबमध्ये कापूस लागवड क्षेत्रात यंदा २७ टक्‍के घट

कडधान्यांची ४६ हजार ५४८ हेक्टर (५६.५१ टक्के) पेरणी झाली. त्यात तूर ३६ हजार २३८ हेक्टर (७८.८५ टक्के), मूग ७ हजार ४५५ हेक्टर (२७.४३ टक्के), उडदाची २ हजार ७२७ हेक्टर (३०.०३ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांमध्ये ज्वारी २ हजार २२२ हेक्टर (३०.३० टक्के), बाजरी ५२८ हेक्टर (४५.२१ टक्के), मका ८४१ हेक्टर (८३.७७ टक्के) पेरणी झाली.

Cotton Sowing
HTBT Cotton Sowing : ‘एचटीबीटी’ लागवड करणाऱ्यांऐवजी विक्रेत्यांवर आता कारवाई

हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ३ लाख हेक्टरवर (९१.८२ टक्के) त्यात कपाशीचे लागवड क्षेत्र ९.४१ टक्के, तर सोयाबीनची २ लाख ६० हजार ९० हेक्टर (१०१.६३ टक्के) पेरणी असून, एकूण पेरणी क्षेत्रात सोयाबीनचे क्षेत्र ७६.०१ टक्के आहे. कडधान्यांची ४५ हजार ५०४ हेक्टर (७७.१३ टक्के) पेरणी झाली. त्यात तूर ३६ हजार ७९९ हेक्टर (८१.२२ टक्के), मूग ४ हजार हेक्टर (५९.६१ टक्के), उडीद ३ हजार ८६७ हेक्टर (६५.७८ टक्के) पेरणी झाली.

परभणी हिंगोली कपाशी लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ३२००० २७८९५ ८७.१७

जिंतूर २७२८५ २८१९५ १०३. ३३

सेलू २८८३१ ३२७४९ १०९.७८

मानवत २१२३३ २३६७३ १११.४९

पाथरी २१२२८ १७९४० ८४.५१

सोनपेठ १६४०१ १६०८२ ९८.०५

गंगाखेड १९६८३ २२८९३ ११६.३१

पालम १४५३५ १४९८७ १०३.११

पूर्णा १००१५ ५७९६ ५७.८७

हिंगोली २९७९ ४०८६ १३७.१३

कळमनुरी ८२७९ ७६१५ ९१.९८

वसमत १७००० १०१७२ ५९.८४

औंढा नागनाथ ६७०२ ६८०० १०१.४६

सेनगाव ३८६० ३५३६ ९१.९८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com