Rice Mill : सात राइस मिलला टाकले काळ्या यादीत

Gondia Rice Mill : गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत हमीभावाने खरेदी केली जाते.
Rice Mill
Rice MillAgrowon
Published on
Updated on

Gondia News : देवरी तालुक्‍यातील सात राइस मिलमध्ये भरडाई केलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा आणि खाण्यायोग्य नाही. परिणामी, या तांदळाचे लॉट रद्द करून या सातही राइस मिलला तीन वर्षांसाठी केंद्रीय पथकाने तपासणी करून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या विरोधात राइस मिल संचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत हमीभावाने खरेदी केली जाते. खरेदी केलेल्या या धनाची भरडाई राइस मिलच्या माध्यमातून होते. देवरी तालुक्‍यातील वसंत राइस मिल डोंगरगाव, तिरुपती राइस मिल देवरी, महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्री चिचगड, मॉ भगवती राइस इंडस्ट्री देवरी, इंडियन फूड प्रॉडक्‍ट चिचगड, बालाजी राइस मिल बोरगाव बाजार व मॉ शक्‍ती राइस इंडस्ट्री देवरी यांच्याशी भरडाईचा करार करण्यात आला होता.

Rice Mill
Black Rice Farming : काळ्या भाताची शेती कमावून देईल बक्कळ पैसा!

भरडाई केलेला तांदूळ देवरी तालुक्‍यातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने भाड्याने घेतलेला गोदामात एप्रिल २०२२ मध्ये साठविण्यात आला. त्या वेळी असलेले तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अगडे यांनी या सातही राइस मिलर्सने जमा केलेला २७ लॉट तांदळाची गुणवत्ता तपासून तांदूळ जमा केला होता.

Rice Mill
Rice Sowing : आजऱ्यात भात पेरणी पन्नास टक्के पूर्ण

मात्र ७ मे रोजी केंद्रीय पथकाने गोदामात साठविलेल्या तांदळाची तपासणी केली. या वेळी हा तांदूळ मानवी खाण्यास योग्य नसल्याचे सांग या तांदळाचे लॉट रद्द करीत सातही राइस मिलर्सला तीन वर्षांकरिता शासकीय धान्याची भरडाई करिता धान्य देऊ नये, असे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भाने दुजोरा दिला आहे.

राइस मिलर्स न्यायालयात

गोदामात साठवण्यापूर्वी तांदळाची गुणवत्ता तत्कालीन अधिकारी सतीश अगडे यांनी तपासली होती. त्या वेळी उत्कृष्ट असलेला तांदूळ आता निकृष्ट कसा झाला, असा प्रश्‍न उपस्थित करीत राइस मिल संचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com