Team Agrowon
महाराष्ट्रात आणि भारतात भाताची शेती केली जाते. कोकण भागात भात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.
सध्या भातासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे भात, तांदूळ जसं की आंबेमोहोर, बासमती असे वेगवेगळे भात बाजारात उपलब्ध आहेत.
शेतकरी मोठ्या प्रमाणावर भातशेती करतात. परंतु बहुतांश अन्नधान्य पुरवठादारांना सामान्य भातशेतीतून नफा मिळत नाही
अशा परिस्थितीत काळ्या भात किंवा भाताची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. काळ्या भाताला मिळणारी किंमत देखील चागंली आहे
शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी१, फॉस्फरस, मॅग्नेशियम, काळ्या तांदळात असतात. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात फायबर देखील काळ्या भातात असतं.
काळ्या भाताची शेती आसाम, सिक्कीम, मणीपूरमध्ये होते. अलीकडे महाराष्ट्रातही शेतकरी काळ्या धानाची लागवड करत आहेत. या धान्याची शेतीसुद्धा सामान्य तांदळासारखीच केली जाते.
काळ्या तांदळाती किंमत बाजारात 400 ते 500 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे याची शेती केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल