‘पेसा’अंतर्गत ग्रामपंचायत सदस्यांना स्वतंत्र प्रशिक्षण द्यावे

राज्यातील १३ जिल्ह्यांत अनुसूचित क्षेत्र असून त्या क्षेत्रासाठी ‘पेसा’ कायदा लागू आहे. त्याठिकाणी राज्य सरकारच्या सामान्य कायद्यांऐवजी स्वशासनाचे अधिकार व त्याअंतर्गत असणाऱ्या विषयांवरील निर्णयाचे विशेष अधिकार अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना देण्यात आले आहेत.
Yashada
YashadaAgrowon
Published on
Updated on

फुलवडे, ता. आंबेगाव ः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे स्वतंत्ररीत्या प्रशिक्षण (Training For Sarpanch) आयोजित करण्याबाबतचे निवेदन आदिवासी समाज कृती समिती (Adivasi Kruti Samiti) महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने पुणे येथील यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कल्लशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांना देण्यात आल्याची माहिती संस्थापक, संचालक सीताराम जोशी यांनी दिली.

Yashada
Tribal Governance : पेसा ग्रामसभेमार्फत आदिवासींचे स्वशासन

राज्यातील १३ जिल्ह्यांत अनुसूचित क्षेत्र असून त्या क्षेत्रासाठी ‘पेसा’ कायदा लागू आहे. त्याठिकाणी राज्य सरकारच्या सामान्य कायद्यांऐवजी स्वशासनाचे अधिकार व त्याअंतर्गत असणाऱ्या विषयांवरील निर्णयाचे विशेष अधिकार अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे प्रशिक्षण स्वतंत्ररीत्या आयोजित करावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचे जोशी यांनी सांगितले.

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत नवनियुक्त सरपंचांचे चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण नुकतेच तळेगाव दाभाडे येथे पार पडले. आदिवासी समाज कृती समितीने केलेल्या मागणीनुसार अनुसूचित क्षेत्रातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे प्रशिक्षणाचा आराखड्यात समावेश असून त्याचे आयोजन पंचायत राज प्रशिक्षण केंद्र वर्ये (ता. सातारा) यांच्याकडून आंबेगाव, जुन्नर तालुक्यांसह राज्यातील सर्वच पेसा क्षेत्रातील तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे.
मल्लिनाथ कल्लशेट्टी, उपमहासंचालक, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com