Agriculture Award : श्रमजीवी शेतकरी कंपनीला चेंज मेकर अवॉर्ड

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीने ग्रेडिंग, वॅक्‍स कोटिंगच पर्याय संत्रा उत्पादकांना उपलब्ध करून दिला आहे.
Farmer Company
Farmer CompanyAgrowon

अमरावती ः मिहानस्थित आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) च्या वतीने आयोजित ग्लोबल समिटमध्ये वरुडच्या श्रमजीवी नागपुरी संत्रा (Nagpur Orange) उत्पादक कंपनीला चेंज मेकर अवॉर्डने (Change Maker Award) सन्मानित करण्यात आले.

संत्रा विपणन क्षेत्रात भरीव कामगिरी करीत त्या माध्यमातून अडीच ते तीन कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचे उद्दिष्ट्य साधल्याबद्दल कंपनी संचालकांचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला.

सामाजिक तसेच कृषी क्षेत्रात वैयक्‍तिक आणि समूहस्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव आयआयटीच्या वतीने ग्लोबल समिटच्या माध्यमातून करण्यात आला.

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीने ग्रेडिंग, वॅक्‍स कोटिंगच पर्याय संत्रा उत्पादकांना उपलब्ध करून दिला आहे.

या माध्यमातून फळांचा दर्जा राखल्याने बिग बास्केट, कृषियोग, रिलायन्स फ्रेश, ओटिफाय अशा नामांकित कंपन्यांना त्यांच्याद्वारे पुरवठा होत आहे.

यातूनच श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीची उलाढाल अडीच ते तीन कोटी रुपयांवर पोचली आहे.

Farmer Company
Mahanand Milk : तोट्यामुळे ‘महानंद’चे भविष्य अंधकारमय

शेतकरी उत्पादक कंपनीने घेतलेल्या या भरारीची दखल घेत आयआयएमच्या वतीने त्यांना चेंज मेकर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

शेतकरी कंपनीचे अध्यक्ष नीलेश मगरदे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी नागपूर फर्स्टचे संचालक तनवीर मिर्जा, डॉ. अविनाश सावजी, डॉ. प्रगती गोखले, डॉ. ओ. पी. गोयल उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com