Crop Damage : नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्र बाधित

Nanded Crop Damage : नांदेडमध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेडमध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा फटका जिल्ह्यातील कंधार व लोहा तालुके वगळता इतर १४ तालुक्यांतील एक हजार २४७ गावांतील पाच लाख शेतकऱ्यांना बसला आहे. यात सर्वाधिक जिरायती पिकांना बाधा झाली आहे. तर जमिनी खरडूनही नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविला आहे.

नांदेडमध्ये जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. यानंतर मात्र जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस सर्वच तालुक्यांत झाला. परंतु शेतीपिकांचे नुकसान मात्र कंधार व लोहा तालुका वगळता किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, भोकर या तालुक्यांत नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : अतिवृष्टीधारकांना तत्काळ मदतीची गरज

या तालुक्यातील अनेक मंडलांत एकापेक्षा अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे पावसाची टक्केवारीही वार्षिक सरासरीच्या ६५ टक्क्यांवर पोहोचली आहे. या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील एक हजार २४७ गावातील पाच लाख शेतकऱ्यांना बसला आहे.

यात जिरायती क्षेत्राचे चार लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तर ७०१० हेक्टर बागायती, ३७१ हेक्टर वरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय यंत्रणांकडून नुकसानीबाबत प्राथमिक माहिती घेऊन शासनाला कळविण्यात आले आहे.

कंधार, लोहा तालुक्यांत नुकसान नाही

जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान मात्र कंधार व लोहा तालुक्यांत झाले नसल्याचा अहवाल शासनाला कळविला आहे.

Crop Damage
Wild Boar Crop Damage : कळंबमध्ये उसाचे रानडुकरांकडून नुकसान

या दोन तालुक्यात खडकाळ व मुरुमाड जमिनीचे प्रमाण अधिक आहे. सततच्या पावसामुळे या तालुक्यातही नुकसान झाले असताना नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी कळविला आहे. त्यामुळे दोन तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत.

तालुकानिहाय बाधित शेतकरी तसेच नुकसान क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका बाधित शेतकरी नुकसान क्षेत्र

नांदेड ५,२४७ ३,५४४

मुदखेड २१,६५० १३,४६०

अर्धापूर २४,२८३ १९,५५६

कंधार शून्य शून्य

लोहा शून्य शून्य

देगलूर ५४,३३१ ६४,३९८

नायगाव ५३,०२७ ३७,०७२

मुखेड ७७,८२३ ६९,६०२

बिलोली ५२,२५३ ४७,६४६

धर्माबाद २२,४५० १४,३६६

किनवट ५२,४१५ ५७,७४८

माहूर २४,९४० २७५५४

हिमायतनगर ८६२ २८,२६७

भोकर २८,३१५ १४,६४४

हदगाव ६२,१७३ ५६,६५८

उमरी २०४०० १३,५००

एकूण ५,००,१६९ ४,४६,७८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com