Home grown seeds : घरगुती बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना खर्च कमी

Seed Update : घरगुती बियाणे वापरून शेतकरी आपला खर्च कमी करू शकतो, असे मत आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.
MLA Nitin Deshmukh
MLA Nitin DeshmukhAgrowon
Published on
Updated on

Akola Seed News : ‘‘घरगुती बियाणे वापरून शेतकरी आपला खर्च कमी करू शकतो,’’ असे मत आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी व्यक्त केले. पातूर येथे झालेल्या बियाणे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

कृषी विभागाने पंचायत समितीच्या बचत भवनात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पंचायत समिती सभापती सुनीता अर्जुनराव टप्पे, बाजार समिती सभापती अरुण कचाले, संचालक अर्जुन टप्पे, जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पवार, पंचायत समिती सदस्य गोपाल ढोरे, सूरज झडपे, तसेच डॉ. धर्माळे, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, पंचायत समिती कृषी अधिकारी जयंत सोनोने यांची प्रमुख उपस्थिती होती.

MLA Nitin Deshmukh
Seed Fertilizer Selling : बोगस बियाणे, खत विक्री करणाऱ्यांवर ‘वॉच’

बियाण्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बाजारातील महागड्या बियाण्यांऐवजी शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याकडे वळावे यासाठी कृषी विभागतर्फे बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक अमोल इढोळे यांनी केले. प्रास्ताविक कृषी सहाय्यक संजय सरकटे यांनी केले.

सदर बियाणे महोत्सवाला मंडळ कृषी अधिकारी आय. एच. थोरात, कृषी पर्यवेक्षक बी. आर. इंगळे, कृषी सहाय्यक शरद पवार, अनिल सुरवाडे, संजय सरकटे, विनोद देवकर, मनोहर इंगळे, अरुण ताले, शुद्धधन गेडाम, शीतल देवकर, वंदना ताकझुरे, बीटीएम किरण दंदी, शेतकरी संग्राम देशमुख, मंगेश चव्हाण, प्रल्हाद वाघोळे, प्रमोद भालतिलक, अनिल अंधारे, रमेश निमकंडे, शुभम डाबेराव, गोपाल शेळके, गजानन कराळे इत्यादी आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com