सिंदखेडराजा : गावोगाव बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक

अकोला ः सिंदखेडराजा तालुक्‍यात दरवर्षी सोयाबीन लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यातच मागील हंगामात सोयाबीन काढणीच्या काळात सततचा पाऊस झाल्याने पीक खराब झाले. सोयाबीन बियाण्याचा तुटवडा, कमतरता पडू नये यासाठी कृषी विभाग गावागावात सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया प्रशिक्षण मोहीम राबवित आहे.
Demonstration of seed germination capacity in villages
Demonstration of seed germination capacity in villages
Published on
Updated on

अकोला ः सिंदखेडराजा तालुक्‍यात दरवर्षी सोयाबीन लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यातच मागील हंगामात सोयाबीन काढणीच्या काळात सततचा पाऊस झाल्याने पीक खराब झाले. सोयाबीन बियाण्याचा तुटवडा, कमतरता पडू नये यासाठी कृषी विभाग गावागावात सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया प्रशिक्षण मोहीम राबवित आहे. तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्या मार्गदर्शनात कृषी सहायकामार्फत हे काम सुरू आहे.

सिंदखेडराजा तालुक्‍यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला आहे. यावर्षी पुन्हा त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. यासाठी लागणाऱ्या बियाण्याचा पुरवठा महाबीज व इतर खासगी कंपन्या मार्फत केला जातो. मागीलवर्षी सर्वत्र सोयाबीन काढणीच्या काळात पाऊस झाल्याने सोयाबीन बियाण्याचा उगवण क्षमतेचा अहवाल मोठ्या प्रमाणावर नकारात्मक येण्याचे नाकारता येत नाही.  

लॉकडाऊनमुळे बियाण्याचा पुरवठा सर्वत्र होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नंतर अडचणी येऊ नये या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्वत:जवळचे बियाणे वापरावे, अशा सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता चाचणी घेऊनच नंतर त्या प्रमाणात बियाण्याची पेरणी करावी. त्यामुळे पेरणीनंतर शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमतेच्या अडचणी येणार नाहीत. यासाठी काळजी घेण्याचे सुचवले जात आहे.

सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून कृषी कर्मचारी हे काम योग्य प्रकारे पार पाडत आहेत. त्यासोबतच कोरोनाचे संकट टाळण्यासाठी सुद्धा जनजागृती केली जात आहे. खरीप हंगामात वापरावयाच्या सर्वच पिकांच्या बियाण्याची उगवणक्षमता चाचणी करून घ्यावी आणि बियाणे पेरणीपूर्व संस्कार म्हणजे बीज प्रक्रिया करून योग्यवेळी करावी. कपाशी पिकातील बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चांगला पाऊस झाल्यानंतरच लागवड करण्याचे आवाहन कृषी सहायक समाधान वाघ यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com