SEBI : शेतमाल घसरणीमागे‘सेबी’ची अकार्यक्षमता

देशांतर्गत कपाशीची उत्पादकता कमी होणार असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र त्यानंतर देखील दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
SEBI
SEBIAgrowon

यवतमाळ : देशांतर्गत कपाशीची उत्पादकता (Cotton Productivity) कमी होणार असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र त्यानंतर देखील दरात (Cotton Rate) घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. याला सेबी (SEBI) (भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ)ची अकार्यक्षमता कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे (Lalit Bahale) यांनी पत्रकार परिषदेत केला.

SEBI
SEBI : ठेवीदारांचे ४१ कोटी रुपये परत द्यावेत

ललित बहाळे म्हणाले, एमसीइएक्स प्लॅटफॉर्मवरील वायदे बंद पडले आहेत. डिसेंबर पर्यंत सौदे रोल ओव्हरमध्ये थांबले आहेत. जानेवारीपासून नवीन सौदे लॉन्च होणे अपेक्षित होते. पण सेबीकडून परवानगी प्रलंबित आहे. नवीन संदर्भ किमतीबद्दल अंदाज येत नसल्याने कापूस ५०० ते ७०० रुपयांनी घसरला आहे. या बाबत कापसाचा वायदे बाजार सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित पावले उचलावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

चीन, ऑस्ट्रेलियातील सूत आयात करण्यात आले आहे. हे डंपिंग त्वरित थांबले पाहिजे कारण त्यामुळे देखील कापसाच्या बाजारावर परिणाम झाला आहे. ‘सीसीआय’ची प्रस्तावित कापूस खरेदी सुरू करण्यात येऊ नये. सीसीआय खुल्या बाजारातून कापूस खरेदी करून नंतर दर वाढले की बाजारात विक्रीचा सपाटा लावते त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी (ता. ९) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येतील. त्यानंतर ही प्रश्न सुटला नाही तर सोमवारी (ता. २३) सेबी कार्यालयामुळे धरणे कार्यक्रम होईल. पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे विजय निवल, मिलिंद दामले, सतीश देशमुख, राजू झोटिंग, प्रज्ञा बापट, धर्मेंद्र कुत्तरमारे, अक्षय महाजन, गोपाल ठाकरे, गोपाल भोयर, गजानन कोल्हे, गजानन ठाकरे, जयंत बापट, इंदरचंद बैद उपस्थित होते.

सरकार कोणतेही असले तरी बाजारात शेतमालाचे दर दबावात कसे राहतील याचेच प्रयत्न त्यांच्याकडून केले जातात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच वायदे बाजार सुरू करावा, अशी मागणी केली आहे. सेबीकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

- ललित बहाळे, अध्यक्ष, शेतकरी संघटना (शरद जोशी प्रणीत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com