Gram Panchayat Election : सांगलीतील ३८ गावांचे सरपंच बिनविरोध

जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंग भरू लागला आहे. अर्ज माघारीनंतर ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले असून, विविध ग्रामपंचायतींमधील ५७० सदस्य बिनविरोध झाले आहेत.
Gram Panchayat Elections
Gram Panchayat ElectionsAgrowon
Published on
Updated on

सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत (Gram Panchayat Election) रंग भरू लागला आहे. अर्ज माघारीनंतर ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच (Sarpanch) बिनविरोध झाले असून, विविध ग्रामपंचायतींमधील ५७० सदस्य बिनविरोध झाले आहेत. आता उर्वरित सरपंचपदाच्या ४०९ जागांसाठी ११२०, तर ४१४६ सदस्यपदांसाठी ८६०४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. मतदान १८ डिसेंबरला होणार असून स्थानिक नेत्यांनी आपल्या पॅनलच्या विजयासाठी कंबर कसली आहे.

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Election : कोल्हापुरात २३ सरपंच, ४९१ सदस्य बिनविरोध

जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंग भरू लागला आहे. यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इच्छुक उतरल्याने विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे बंडखोर इच्छुकांची समजूत काढून त्यांचे अर्ज माघार घेता-घेता नेत्यांची चांगलीच दमछाक झाली.

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Election : जळगाव जिल्ह्यात १२९२ उमेदवारांची माघार

निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्यपदांच्या एकूण ४७१६ जागा आहेत. त्यासाठी तब्बल १६ हजार ६५ उमेदवारांचे १६ हजार ४४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सरपंचपदाच्या ४४७ जागांसाठी दोन हजार ४५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३८ सरपंचांची बिनविरोध निवड झाली.

उर्वरित ४०९ जागांसाठी एक हजार १२० उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदांच्या चार हजार ६९ जागांसाठी १४ हजार ३३० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच हजार ५६६ जणांनी माघार घेतली. सदस्यांच्या ५७० जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित ३ हजार ६९९ जागांसाठी आठ हजार ६०४ उमेदवार मैदानात आहेत. म्हणजेच सरपंच आणि सदस्यपदांच्या एकूण ४५५५ जागांसाठी ९७२४ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी दुरंगी लढती होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या गावांपैकी येलूर, कोळे, धोत्रेवाडी, गौडवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडीच्या सरपंचांसह सदस्य बिनविरोध झाले. याशिवाय तांदूळवाडी आणि बनेवाडीचे सरपंचही बिनविरोध निवडून गेले. शिराळा तालुक्यातील कोकरूड, शिवरवाडी, भैरेवाडी, फुपिरेचे सरपंच आणि चिखली, खुंदलापूर, वाकाईवाडी आणि शिंदेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

तासगाव तालुक्यातील चिंचणी आणि आरेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. कडेगाव तालुक्यातील विहापूर, येवलेवाडी ग्रामपंचायत, खानापूर तालुक्यातील गार्डी, ढवळेश्वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी, मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील रेवनाळ, शिंगणापूर, पलूस तालुक्यातील पुणदीवाडी आणि हजारवाडी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com