Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
Palkhi Sohala
Palkhi Sohala Agrowon

Pune News : आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्यांसह देहूत दाखल झाले आहेत.

देहूतील मुख्य देऊळवाड्यात गुरुवारी (ता. ८) पहाटेपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देहू नगरपंचायत प्रशासनाने सोहळ्यातील भाविकांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून तयारी पूर्ण केली आहे.

सरकारच्या वतीने निर्मल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी एक हजार शौचालये देहूत उभारली आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे.

Palkhi Sohala
Ashadhi Wari 2023 : ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ संकल्पनेवर आषाढी वारीचे नियोजन

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानकरी, सेवेकरीही दाखल झाले आहेत. सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला पॉलिश करण्यात आले आहे. रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी गावात दाखल झाल्याचे पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे यांनी सांगितले. या वेळी भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे उपस्थित होते.

देहूत प्रसाद आणि वारीतील किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दहा टॅंकरची सोय केली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, इस्कॉनतर्फे भाविकांसाठी अन्नदानाची सोय करण्यात आली आहे. वाहनांसाठी सरकारी गायरानात वाहनतळ उभारले आहे.

Palkhi Sohala
Ashadhi Wari 2023 : महिला वारकऱ्यांसाठी आरोग्य वारी उपक्रम

...असा असेल पालखी प्रस्थान सोहळा

- पहाटे पाच वाजता ः विठ्ठल- रुक्मिणी मंदिर आणि संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख आणि विश्‍वस्तांच्या हस्ते महापूजा

- पहाटे साडेपाच वाजता ः पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरात पूजा.

- सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ः देऊळवाड्यातील भजनी मंडपात देहूकर महाराज यांचे पालखी सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन

- सकाळी नऊ ते अकरा ः इनामदार वाड्यात संत तुकाराम महाराज पादुका पूजन

- दुपारी दोन वाजता ः देऊळवाड्यातील भजनी मंडपात पालखी प्रस्थान सोहळ्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रस्थान

- सायंकाळी पाच वाजता ः पालखीची मुख्य मंदिरात प्रदक्षिणा

- सायंकाळी साडेसहा वाजता ः पालखी सोहळा इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी मार्गस्थ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com