Ashadhi Wari 2023 : ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ संकल्पनेवर आषाढी वारीचे नियोजन

Pandharpur Wari News : ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आधारित पर्यावरण संवर्धनाचा जागर आषाढी वारीमध्ये होणार आहे. गतवर्षी दहा हजार वृक्ष लागवड पालखी मार्गावर करण्यात आली होती.
Ashadhi Wari
Ashadhi WariAgrowon

Solapur News : ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आधारित पर्यावरण संवर्धनाचा जागर आषाढी वारीमध्ये होणार आहे. गतवर्षी दहा हजार वृक्ष लागवड पालखी मार्गावर करण्यात आली होती.

यंदा अधिकची वृक्ष लागवड करून प्लॅस्टिक संकलन केंद्रे उभा करण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांना मूलभूत व आरोग्यविषयक सुविधांसह उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (ता. २३) सांगितले.

आषाढी वारी नियोजनाबाबत पंढरपुरात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, नामदेव टिळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, सुनील वाळूजकर, तहसीलदार सुशील बेल्हेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, कबीर महाराज, राणा महाराज वासकर आदी उपस्थित होते.

Ashadhi Wari
Ashadhi Wari : संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर

श्री. स्वामी म्हणाले, की महिला भाविकांच्या आरोग्यविषयक बाबी, स्वच्छता तसेच सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित ठिकाणी महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. आषाढी वारी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, अखंडित वीजपुरवठा, सुरक्षा या बाबींना प्राधान्य द्यावे. पालखी मुक्कामाची व विसावा तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे करण्याबरोबरच पालखी विश्‍वस्तांनी सुचविलेली कामे प्राधान्याने व वेळेत पूर्ण करावीत. पालखी मार्गावर भाविकांना मुबलक व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी पाण्याचे स्रोत शुद्धीकरणाबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही श्री. स्वामी यांनी या वेळी दिल्या.

Ashadhi Wari
Pandharpur Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी एसटीच्या ५ हजार विशेष बसची व्यवस्था

सीसीटीव्हीची राहणार नजर

पोलिस अधीक्षक सरदेशपांडे म्हणाले, की आषाढी यात्रा कालावधीत वारकरी, भाविक व नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य दिले जात आहे. पालखी मार्गावरील बंदोबस्त तसेच वाहतूक याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. शहरात १६२ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com