
अॅग्रोवन वृत्तसेवा
पंढरपूर, जि. सोलापूर ः ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर (Dr. Vijay Bhatkar) यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या सुवर्ण कृषी व ग्रामविकास उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ करकंब व पंढरपूर, बळीराजा ॲग्रोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने बेदाणा उत्पादक शेतकरी मेळावा झाला. यावेळी नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने (Sahyadri Farms) पंढरपुरातील शेतकऱ्यांकडून थेट बेदाणा खरेदीचा निर्णय घेतला.
या मेळाव्याचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष विष्णू मोंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सुवर्ण कृषी व ग्रामविकास उपक्रमाचे समन्वयक नानासाहेब कदम, ‘सह्याद्री’च्या खरेदी विभागाचे क्षितीज अग्रवाल आणि हरीश बावस्कर उपस्थित होते. या वेळी सुवर्ण कृषी व ग्रामविकास उपक्रमाची सविस्तर संकल्पना कदम यांनी मांडली. तर जळगावकर यांनी शासनाने या उपक्रमाची दखल घेण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगितले. रोटरी क्लबच्या वतीने सर्वोतपरी साह्य आपण या उपक्रमाला देऊ, असे आश्वासन मोंढे यांनी दिले.
अग्रवाल आणि बावस्कर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बेदाणा, डाळिंब, केळी, केशर आंबा, सीताफळ खरेदीसाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. सुवर्ण कृषी व ग्रामविकास विभागांतर्गत शेतकऱ्यांचे क्लस्टर विकसित केले जावेत, त्या माध्यमातून आम्ही ही फळे खरेदी करू शकू, बेदाण्यासाठीही आमचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे. किमान ५०० कोटी रुपयांच्या बेदाण्याची खरेदी आम्ही करणार आहोत, असेही ते म्हणाले. या वेळी बळीराजा अॅग्रोटेककडील बेदाणा साठवणूक आणि एकूण क्षमतेची पाहणी सर्वांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.