Sahyadri Farms
Sahyadri FarmsAgrowon

Sahyadri Farms : खासगी बाजाराचा सह्याद्री फार्मरला देशातील पहिला परवाना

पणन संचालक पवार यांच्याकडून अध्यक्ष विलास शिंदे यांना परवाना प्रदान
Published on

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः बाजार समित्यांमधील पारंपरिक कायदे आणि व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक आणि पिळवणूक टाळण्यासाठी पणन सुधारणांमध्ये खासगी बाजार समित्या (Priveate Market Committee) उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Company) देखील खासगी बाजार समिती उभारू शकतात.

Sahyadri Farms
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करा

या अंतर्गत शेतकरी कंपनीला देशातील पहिली बाजार समिती उभारण्याचा मान मोहाडी (जि.) नाशिकच्या सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीला मिळाला आहे. खासगी बाजार समितीचा परवाना बुधवारी (ता. २) पणन संचालक सुनील पवार यांनी सह्याद्रीचे अध्यक्ष विलास शिंदे (Vilas Shinde) यांना प्रदान केला.

Sahyadri Farms
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना फटका

या वेळी बोलताना पवार म्हणाले, ‘‘शेतीमाल पणन व्यवस्था सुधारणांतर्गत शेतीमाल विक्री व्यवस्थेतील बाजार समित्‍यांची एकाधिकारशाही कमी करण्यासाठी थेट पणन, एकल परवाना, खासगी बाजार समित्यांचे परवाने देण्याची शासनाची भूमिका आहे. या अंतर्गत राज्यात ७३ खासगी बाजार समित्यांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र अद्याप शेतकरी उत्पादन कंपनीने स्वतःची खासगी बाजार समिती उभारली नव्हती. यासाठी मोहाडीच्या (जि. नाशिक) सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीने अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना आज परवाना दिला आहे. यामुळे ‘सह्याद्री’ खासगी बाजार समिती उभारणारी देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे.’’

या बाबत ‘सह्याद्री’चे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, ‘‘सह्याद्री कंपनी द्राक्ष, टोमॅटोमध्ये कंत्राटी शेती बरोबरच, उत्पादनापासून ते प्रक्रिया आणि निर्यातीमध्ये काम करत आहे. मात्र यामध्ये बाजार समिती म्हणून आम्ही कमी होतो कंपनीच्या सभासदांबरोबच परिसरातील शेतकऱ्यांना पारंपरिक बाजार समितीला पर्याय होऊन, स्पर्धात्मक दर मिळावा यासाठी आम्ही बाजार समिती उभारली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.’

...अशी आहे सह्याद्री फार्मर प्रायव्हेट ॲग्री मार्केट लि.
- कंपनीच्या ११० एकर मधील बाजार समितीसाठी ६ एकर जागा
- बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काट्यासह पायाभूत सुविधा
- भविष्यात टप्प्याटप्प्यात शेतीमाल खरेदी विक्रीचे १०० परवाने देणार
- भविष्यात ऑनलाइन लिलाव सुरू करणार

स्पेशल कमोडिटी मार्केट होणार
सह्याद्रीच्या माध्यमातून द्राक्ष, टोमॅटो, बेदाणा आणि सुकामेव्याची विशेष बाजार समिती निर्माण होणार आहे.
नाशिकमध्ये वाढतेय काजू शेती
नाशिक जिल्ह्यात सध्या १५ हजार एकरांवर काजूची लागवड झाली असून, भविष्यात काजूसाठी बाजार समितीमध्ये लिलाव होणार असल्याने काजूबरोबर हळददेखील वाढत आहे.

दृष्टिक्षेपात खासगी बाजार समिती आणि थेट पणन
- खासगी बाजार समित्या - ७३ - उलाढाल - ४ हजार ५५५ कोटी रुपये
- थेट पणन परवाने - १ हजार ४६० --- उलाढाल १ हजार ३६८ कोटी रुपये
- एकल परवाने - ३३ --- उलाढाल ---५ हजार ५६३ कोटी रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com