Pulses
PulsesAgrowon

Pulses Stock : केंद्रीय पथकाकडून डाळींच्या साठ्याचा आढावा

तीन सदस्यीय पथकाने जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह दालमिल मालक, विक्रेते आणि अडत्यांची येथे बैठक घेत त्याबाबत सूचना दिल्या.

Akola Market News : देशात सध्या तूर, उडीद आदी डाळींचे दर (Pulses Rate) वाढत आहेत. ही स्थिती पाहता या डाळींचा काळाबाजार होऊ नये. साठेबाजी होणार नाही, यासाठी लक्ष ठेवत डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेण्याची सूचना केंद्रीय पथकाने केली.

तीन सदस्यीय पथकाने जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह दालमिल मालक, विक्रेते आणि अडत्यांची येथे बैठक घेत त्याबाबत सूचना दिल्या.

केंद्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयातील उपसंचालक सुभाषचंद्र मीना यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक शनिवारी (ता. १५) जिल्हा दौऱ्यावर आले होते.

Pulses
Pulses Market : देशातील तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन का घटले

या पथकाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसह दालमिल मालक, घाऊक विक्रेत्यांची बैठक घेतली. पथकाने अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही धान्य खरेदी करणारे व्यापारी व अडत्यांसोबत चर्चा केली.

Pulses
Pulses Stock : डाळींच्या साठेबाजीला आळा घालण्यास प्राधान्य

तूर व उडीद डाळींची कृत्रिम साठेबाजी होणार नाही यादृष्टीने मार्गदर्शन केले. तूर व उडीद डाळींच्या दैनंदिन खरेदी व विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी केंद्र शासनाच्या संबंधित पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत डाळ मिल मालक व घाऊक विक्रेत्यांना सुचवले.

या वेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसह जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल पळसपगार हे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com