Pulses Market : देशातील तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन का घटले

भारतामध्ये कडधान्याची आयात वाढत आहे. देशातील कडधान्य उत्पादन वाढली मात्र. उत्पादनवाढीचा वेग मागणीच्या तुलनेत कमीच आहे
Pulses Market
Pulses MarketAgrowon

कापूस आवक घटली
1. देशातील बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) काहीसे वाढलेले दिसतात. मात्र सरासरी दरपातळी आजही कायम होती. पण दुसरीकडे बाजारातील कापूस आवक (Cotton Arrival) घटल्याचे व्यापारी सांगत आहेत.

आजही देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव (Cotton Market Rate) ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर (Cotton Export) वाढलेले आहेत. देशातील कापूस दरही वाढण्याचा अंदाज आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

सोयाबीन दर कायम
2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडचे (Soya Meal Rate) दर टिकून आहेत. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोयाबीन १५.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

तर सोयापेंडचा भाव ४७४ डाॅलर प्रतिटनांवर होते. तर देशातील बाजारात सोयाबीनचे (Soybean Market) दर दबावात आहेत. आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. सध्या खाद्यतेल साठ्याचा (Edible Oil Stock) दरावर दबाव दिसतो.

संच आवकही जास्त आहे. पण पुढील काळात सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभरा बाजार दबावातच
3. देशातील काही बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल झाला. या हरभऱ्यामध्ये थंडीमुळे ओलावा काहीसा अधिक आहे.

त्यामुळे सध्या ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांपर्यंत हरभऱ्याला दर मिळतोय. पुढील महिनाभरात बाजारातील हरभरा आवक वाढेल. त्यामुळे हरभरा बाजाराला सरकारच्या हमीभाव खरेदीचा आधार मिळणे आवश्यक आहे.

सरकारने मागीलवर्षीप्रमाणे खरेदी केल्यास खुल्या बाजारातही हरभरा दर हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

फ्लावरचे भाव वाढले

4. बाजारात सध्या फ्लाॅवरची आवक घटली आहे. त्यामुळे दरही काहीसे वाढले आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर बाजार वगळता इतर ठिकाणची आवक सरासरी १० क्विंटलपेक्षाही कमी दिसते. त्यामुळे सध्या फ्लाॅवरला सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Pulses Market
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त होऊनही देशात खाद्यतेल महाग का ? |

भारताला कडधान्य आयात का वाढवावी लागली?

5. भारतामध्ये कडधान्याची आयात वाढत आहे. देशातील कडधान्य उत्पादन वाढली मात्र. उत्पादनवाढीचा वेग मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्याला काही कारणे आहेत. त्यापैकी सरकारचं धोरण हे एक महत्वाचं कारण आहे.

देशात वर्षाला कडधान्याची सरासरी २७० ते २७५ लाख टनांची आवश्यकता असते. तर देशात केवळ २५० ते २५५ लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होते. म्हणजेच सरकारला २० ते २५ लाख टन कडधान्याची आयात करावी लागते. देशाला तुरीची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. यंदा तर तुरीची आयात विक्रमी पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. देशातील तूर उत्पादन यंदा ३२ ते ३३ लाख टनांच्या दरम्यान राहू शकते.

त्यामुळे सरकारने १० लाख टन तूर आयातीचे उद्दीष्ट ठेवले आहेत. तर उडदाची आयातही वाढण्याचा अंदाज आहे. यंदा उडदाचेही उत्पादन घटले. भारताला आफ्रिकेतून तूर तर म्यानमारमधून उडदाचा पुरवठा होतो. देशातील उत्पादन घटल्याने या दोन्ही कडधान्यांचे दर वाढले आहेत.

मुगाचेही दर तेजीत असले तरी सरकारकडे मुगाचा साठा असल्याने तो बाजरात येण्याची शक्यता आहे. पण यंदा तुरीला किमान सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळू शकतो. तर उडदाचेही भाव याच दरम्यान राहू शकतात, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यसकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com