

Solapur News : महाराष्ट्रात मॉन्सून सुरू झाला, तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यातील नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाचे आगमन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा कालव्यात पाणी सोडण्याची मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.
पुरेसा पाऊस होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, पेरणी वेळेवर होण्यासाठी शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. ऊस लागवडीकरिता जमिनीची मशागत करून ठेवली आहे.
परंतु पाण्याअभावी ऊस पिकांची लागवड झालेली नाही. शेतकऱ्यांची इतर उभी पिके धोक्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घ्यावा, मागील काही वर्षांपासून शेतकरी कोरोनामुळे तसेच शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.
त्यातच अद्यापपर्यंत मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस पडला नसल्या कारणाने पुन्हा आर्थिक संकटांची चिंता जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या फळबागा पिके पाण्याअभावी जळू लागल्या आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.